Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपळसुटी गाव ठरतेय हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक !

मिरजगाव :  एकीकडे जाती धर्माच्या भिंती उभारून भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच मिरजगांव शेजारीच अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आ

चौपदरीकरण रस्त्यांमुळे शहराचे सौंदर्य वाढणार – महसूलमंत्री ना.थोरात
ह.भ.प.बाबाजी महाराज चाळक यांच्या हस्ते लोकनेते आण्णासाहेब शेलार यांच्या श्रीगोंदा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी सुधीर पुंडेकर सज्ज

मिरजगाव :  एकीकडे जाती धर्माच्या भिंती उभारून भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच मिरजगांव शेजारीच अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्टी तालुक्यातील पिंपळसूटी या गावामध्ये मात्र हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न संभाजी सकट व जावेद सय्यद यांच्या पुढाकारातून केला जात आहेत.

राष्ट्रसंत गाडगे बाबा जयंती व रमजान ईदचा महिना याचे औचित्य साधून ग्रामस्वछता अभियान गावामध्ये नुकतेच राबविण्यात आले. गावातील विविध रस्ते, मारुती मंदिर तसेच दंबरहजारी बाबा परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानाच्या निमित्ताने संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा जागर करून “मानव सेवा हिच खरी ईश्वरसेवा ” असा संदेश देण्यात आला. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, परिसर स्वच्छ ठेवा , पर्यावरणाचे संवर्धन करा तसेच सामाजिक , धार्मिक सलोखा ठिकवा असे मत सामाजिक कार्यकर्ते संभाजी सकट व जावेद सय्यद यांनी व्यक्त केले.

सीना नदीच्या काठावर वसलेले हे गाव विविध लोकोपयोगी उपक्रमाने नेहमीच चर्चेत असते. येथील वयस्कर पिढी व तरुण पिढी एकत्रित येऊन कधी मंदिर तर कधी दर्ग्यासमोरील ओट्यावर बसून गावाच्या विकासा संदर्भात चर्चा करत असतात. या गावचे वैशिष्टय म्हणजे दसरा, दिवाळी वा ईदसारखे सण – उत्सव सर्व हिंदू – मुस्लिम बांधव एकत्रित येऊन एकोप्याने साजरे करतात. सर्वांना घरी बोलावून फराळ देतात. यात्रेवेळी दंबरहजारी बाबांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करतात. सप्ताह असो वा उरूस सर्वजन एकत्र येऊन साजरे करतात. एक गांव एक गणपती वा पर्यावरण पुरक गणपती बसवण्यावर भर देण्यात येतो. गावातील तरुणांच्या प्रयत्नामुळे गावात सामाजिक ऐक्य व बंधुभावाची भावाना टिकून आहे. पिंपळसुटी हे गाव खऱ्या अर्थाने हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून नावाजले जात आहे.

COMMENTS