Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराणी ताराबाई वडवणी शाळेचे एनएमएमएस परीक्षेत 38 विद्यार्थी उत्तीर्ण

चि.साई ज्योतिराम टिपरे 157 विक्रमी गुण घेऊन तालुक्यातून प्रथम...वडवणी । प्रतिनिधीइयत्ता आठवीतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील (एनएमएमएस) विद

कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली
स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे : राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल कार्यालयाला सापडली 12 आमदारांची यादी

चि.साई ज्योतिराम टिपरे 157 विक्रमी गुण घेऊन तालुक्यातून प्रथम…
वडवणी । प्रतिनिधी
इयत्ता आठवीतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील (एनएमएमएस) विद्यार्थ्यांसाठी 28 डिसेंबर 2025 रोजी घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच अधिकृत संकेतस्थळावर दि.24 फेब्रुवारी 2026 मंगळवारी रोजी जाहीर करण्यात आला यामध्ये महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडवणी येथील शाळेचा चि.साई ज्योतिराम टिपरे याने या परीक्षेत 157  विक्रमी गुण घेऊन वडवणी तालुक्यात प्रथम येत नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे या शाळेचे तब्बल 38 विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा के.आंधळे / डोईफोडे यांनी एनएमएमएस परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनासाठी एक्स्ट्रा तासिकेचे शाळेत नियोजन केले होते विभाग प्रमुख चव्हाण सर,श्री.विष्णू मंत्रे सर तसेच विषय शिक्षक यांच्या सहकार्यामुळे तब्बल 38 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक माजी आमदार केशवराव आंधळे,शालेय समिती अध्यक्ष संजय आंधळे,संस्थेचे अध्यक्ष अनिलदादा चोले,मार्केट कमिटी संचालक रणजीत धस, संस्थेचे संचालक इंजि.अशोक आंधळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा के.आंधळे,उपमुख्याध्यापक मस्के सर,पर्यवेक्षक धाईतिडक सर,श्री.डोईफोडे सर,श्री कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शक शिक्षक व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS