राहाता : भारतीय जनता पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर होताच राहाता शहरात जल्लोषाचे वात

राहाता : भारतीय जनता पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर होताच राहाता शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर तसेच नगरपरिषद पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
विधानसभा, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांदरम्यान डॉ. विखे पाटील यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळवलेल्या यशाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष डॉ. गाडेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेतृत्वाने डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर दाखवलेला विश्वास हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना युवा नेतृत्वाला राज्य संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
“जिल्हा ते राज्य असा प्रवास करत नेतृत्वाला मिळालेली ही संधी आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांचे नेतृत्व निश्चितच मोलाचे ठरेल,” असेही डॉ. गाडेकर यांनी नमूद केले.
या वेळी उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शोभा घोरपडे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, ‘गणेश’चे माजी संचालक मोहनराव सदाफळ, नगरसेवक मुन्ना शहा, राहुल सदाफळ, दशरथ तुपे, नितीन गाडेकर, प्रवीण रुणवाल, संजय सदाफळ, जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, पुनीत बर्डे, सागर कापसे, चेतन रनमाळे, माजी नगरसेवक भीमराज निकाळे, प्रभाकर आरणे, स्वप्नील बावके, दादा दळवी, राजू भातोडे, मंगेश भातोडे, दत्ता सदाफळ, भूषण देसाई, दिलीप वाघ, अंकुश भडांगे , मंगल बोठे, डॉ.वैशाली मस्के आदींसह युवक व महिला कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

COMMENTS