Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणावर भरवस्तीत चाकूने वार

अहिल्यानगर : शिर्डीत पूणमनगर परिसरात एका परप्रांतीय तरुणावर तिघा अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मु

जामखेडमध्ये ड्रग्ज कनेक्शन ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त 
बीडमध्ये पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या
भूमापक माणिक वाघमारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

अहिल्यानगर : शिर्डीत पूणमनगर परिसरात एका परप्रांतीय तरुणावर तिघा अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद दानिश चौधरी याला चाकूने भोसकून आणि दगडांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे शिर्डीत दहशतीचे वातावरण पसरले आहे. दानिश चौधरी हा तरुण शिर्डीत कुरान पठणासाठी आला होता. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तो पुनमनगर भागात फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्याला गाठले. काही समजण्याच्या आतच त्यांनी दानिशच्या डोक्यावर बुक्क्यांनी प्रहार सुरू केला. त्यातील एकाने कमरेला खोचलेला चाकू काढून दानिशच्या पोटावर सपासप वार केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

COMMENTS