Homeताज्या बातम्यादेश

भाजप खा. निशिकांत दुबे महाराष्ट्राविषयी पुन्हा बरळले

मुंबई : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या संदर्भात पुन्हा एकदा वादाला तोंड फोडणारे विधान केले आहे. बिहार, झारखंड, मध्य प

Tuljapur एस टी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासाठी नळदुर्ग येथे आंदोलन | LOKNews24
दिव्यांग तरुणावर अमानुष हल्ला; जिवे मारण्याचा प्रयत्न, तरीही किरकोळ गुन्हा दाखल
कायचिकित्सा विषयात एलआरपी आयुर्वेद मेडिकल कॉलेजचा मंगेश तपकीर राज्यात प्रथम

मुंबई : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या संदर्भात पुन्हा एकदा वादाला तोंड फोडणारे विधान केले आहे. बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचे योगदान नसते, तर मुंबईने काय पाहिले असते, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. आम्ही राजे आहोत, असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना दुबे म्हणाले की, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि बंगालमधील मोठ्या संख्येने लोक रोजगारासाठी मुंबई व महाराष्ट्रात येतात. त्यामुळे काहींना असे वाटते की बाहेरील लोक त्यांच्या हक्कांवर गदा आणत आहेत. मात्र, या राज्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसा व खनिज संपत्ती असून, त्याचा देशाच्या औद्योगिक प्रगतीत मोलाचा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले. देशातील मोठ्या आर्थिक संस्था आणि उद्योगसमूहांचे मुख्यालय मुंबईत असले तरी त्यामागे इतर राज्यांतील संसाधनांचे योगदान असल्याचा दावा त्यांनी केला. लोकशाही व्यवस्थेत जनता हाच खरा राजा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर आपण चार वेळा मुंबईत जाऊन आलो असल्याचेही दुबे यांनी सांगितले. काही राजकीय नेत्यांची भेट घेतल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, दुबे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS