Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भविनिमगावात शिवजयंतीनिमित्त शालेय वस्तूंचे वाटप

भातकुडगाव फाटा : सर्वत्र अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. शेवगावात विविध ठिकाणी शासकीय अधिकारी व

भातकुडगाव फाट्यावरील आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
फार्मसी कॉलेजात आज ‘फार्माफ्युजन’ स्पर्धा
धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा : शेवगाव तहसीलदारांकडे नागरिकांची मागणी

भातकुडगाव फाटा : सर्वत्र अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. शेवगावात विविध ठिकाणी शासकीय अधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील भविनिमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जयंती व आ. मोनिका राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वॉटर बॅगसह शालेय साहित्य भेट देऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शेवगावचे भूमिपुत्र  उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, तहसीलदार आकाश दहादडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, दहिगाव-नेच्या मंडलाधिकारी दहिफळे, कामगार तलाठी काशीद यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.

COMMENTS