Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रगतशील शेतकरी मधुकर उगले यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार मदत 

कोपरगाव शहर प्रतिनिधी- राज्यातील विविध भागांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

गुणवत्तेची कास धरा, मराठी विद्यापीठाला संपूर्ण सहकार्य – मंत्री चंद्रकांत पाटील
निमगाव वाघा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात
पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे पशुपालकांच्या उत्पन्न वाढीस हातभार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
Displaying IMG-20251018-WA1039.jpg

कोपरगाव शहर प्रतिनिधी- राज्यातील विविध भागांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान, जनावरांचे मृत्यू तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहता समाजातील सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे.

अशाच पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर गावचे प्रगतशील शेतकरी  मधुकर उगले यांनी आपल्या सामाजिक जाणिवेचा आणि दायित्वाचा उत्तम आदर्श ठेवत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. नैसर्गिक आपत्तीसमयी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठीच मदतीचा हात पुढे करावा, ही त्यामागची भावना त्यांनी व्यक्त केली.

 उगले हे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत नवनवीन प्रयोग करणारे, तसेच इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या सामाजिक योगदानामुळे स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे कौतुक केले आहे.

राज्य सरकारनेही नागरिकांना अशा प्रकारे मदतीचा हात देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले असून,  मधुकर उगले यांनी दिलेली ही देणगी समाजातील सजग नागरिक म्हणून त्यांच्या संवेदनशीलतेचे प्रतीक ठरली आहे. त्यांच्या या योगदानातून इतर शेतकऱ्यांनीही प्रेरणा घेऊन संकटग्रस्त बांधवांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

COMMENTS