Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीएसआर फाउंडेशनच्या अध्यक्षपदी मेहेत्रे

सचिवपदी सागर मांडगे तर अविनाश नेवसे खजिनदार कर्जत : कर्जतमधील युवा व्यावसायिकांनी एकत्र येऊन विविध सामाजिक काम करण्यासाठी स्थापन केलेल्या सीएसआर फाउंडेशनचा अध्यक्षपदी सागर मेहेत्रे, सचिवपदी सागर मांडगे तर खजिनदारपदी अविनाश नेवसे यांची निवड झाली आहे. सन 2026–27 या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ राम-लता निवास, मेहेत्रे मळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार व सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल, समर्थ विद्यालयाचे प्राचार्य व रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत तसेच कोटा मेंटॉर्स स्कूलचे संस्थापक अध्यक्ष केशव आजबे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व पदग्रहण समारंभ पार पडला.यावेळी प्रास्ताविक सागर मांडगे यांनी केले. नयन खंदारे व अविनाश नेवसे यांनी मनोगत व्यक्त केले. या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसोबतच सदस्यांमध्ये मैत्री दृढ करणे आणि व्यावसायिक वृद्धीसाठी एकमेकांना सहकार्य करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  कार्यक्रमास अशोक दळवी, गणेश मेहेत्रे, सचिन गोरे, शहाबाज आतार, मयूर शहाणे, विकास गोरे, रविंद्र काळे, अशोक तांबे, तुषार नेवसे, किरण शिंदे, नितिन राऊत,अमोल गर्जे आदी सदस्य सहकुटुंब उपस्थित होते. सूत्रसंचालन दादासाहेब शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन अनुज कुलथे यांनी केले.

नायब तहसिलदार यांच्या वाहनाचा अपघात;मोटरसायकल स्वार गंभीर जखमी
माजी आमदारांनी केलेले आरोप अर्धवट माहितीवर आधारलेले : नगराध्यक्ष वहाडणे
राहुरी बस स्थानकाच्या इमारतीचा प्रश्‍न तात्काळ सोडवा

सचिवपदी सागर मांडगे तर अविनाश नेवसे खजिनदार

कर्जत : कर्जतमधील युवा व्यावसायिकांनी एकत्र येऊन विविध सामाजिक काम करण्यासाठी स्थापन केलेल्या सीएसआर फाउंडेशनचा अध्यक्षपदी सागर मेहेत्रे, सचिवपदी सागर मांडगे तर खजिनदारपदी अविनाश नेवसे यांची निवड झाली आहे. सन 2026–27 या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ राम-लता निवास, मेहेत्रे मळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार व सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल, समर्थ विद्यालयाचे प्राचार्य व रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत तसेच कोटा मेंटॉर्स स्कूलचे संस्थापक अध्यक्ष केशव आजबे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व पदग्रहण समारंभ पार पडला.यावेळी प्रास्ताविक सागर मांडगे यांनी केले. नयन खंदारे व अविनाश नेवसे यांनी मनोगत व्यक्त केले.

या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसोबतच सदस्यांमध्ये मैत्री दृढ करणे आणि व्यावसायिक वृद्धीसाठी एकमेकांना सहकार्य करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

कार्यक्रमास अशोक दळवी, गणेश मेहेत्रे, सचिन गोरे, शहाबाज आतार, मयूर शहाणे, विकास गोरे, रविंद्र काळे, अशोक तांबे, तुषार नेवसे, किरण शिंदे, नितिन राऊत,अमोल गर्जे आदी सदस्य सहकुटुंब उपस्थित होते. सूत्रसंचालन दादासाहेब शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन अनुज कुलथे यांनी केले.

COMMENTS