Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘डान्स कोपरगाव डान्स’मध्ये ‘संत ज्ञानेश्वर’ द्वितीय 

कोपरगाव शहर : लायन्स, लिनेस, लिओ क्लब आणि क्रेडाई कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'एक्स्पो २०२६' (वर्ष १३ वे) अंतर्गत 'लिटिल चॅम्प' या भव

अवैध व्यवसायांच्या बिमोडासाठी संघटित कारवाईची
अहिल्यानगरमधील पतसंस्थांसाठी ७.४० टक्के व्याजदर घोषित
माजी सरपंच कोळपे यांची अभिमानस्पद कामगिरी 

कोपरगाव शहर : लायन्स, लिनेस, लिओ क्लब आणि क्रेडाई कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक्स्पो २०२६’ (वर्ष १३ वे) अंतर्गत ‘लिटिल चॅम्प’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर आणि प्रभावी ‘गणेश वंदनेने झाली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध हालचाली, वेशभूषा आणि सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक व परीक्षकांना मंत्रमुग्ध केले.

 परिसरातील विविध शाळेच्या सहभागी विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या स्पर्धेत संत ज्ञानेश्वर स्कूलच्या डान्स ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते शाळेला सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. हे यश स्वीकारताना शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे, शिक्षिका वैष्णवी काळे, सई कापसे, रवी पवार व सर्व विजयी विद्यार्थी उपस्थित होते.

 तर विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे व त्यांचा शिक्षकांचे ‘संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थे’चे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष  राजेंद्र झावरे व कार्यकारी विश्वस्त  विशाल झावरे यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमीच पुढाकार घेते. अशा मोठ्या व्यासपीठावर विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी देखील शाळेचे विशेष आभार मानले व कौतुक केले.

COMMENTS