Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झुडपी जंगलावरील जमिनीबाबत कामाला गती द्या

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना नागपूर : झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयात नागपूर विभागातील जागेबाबत देण्यात आलेल्या यादीनुसार मह

केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन नाहीच
न्यायालयीन कामकाजात गुजराती भाषेचा वापरास सर्वोच्च न्यायालयाचा नकार कायम
विधिमंडळ सर्वोच्च न्यायालय नाकारू शकत नाही

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना
नागपूर : झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयात नागपूर विभागातील जागेबाबत देण्यात आलेल्या यादीनुसार महसूल विभाग आणि वन विभागाने आवश्यक प्रमाणिकरण करून कामाला गती देण्याच्या सूचना महसूल मंत्री यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांना आज दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलाबाबत दिलेल्या निर्णयानंतर पात्र लाभार्थ्यांना जमीन वाटप करण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील स्थितीबाबत महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्यासह नागपूर विभागातील जिल्हाधिकार्‍यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. श्रीमती बिदरी यांनी यावेळी सादरीकरण करून झुडपी जंगलावरील जमिनीविषयी सविस्तर माहिती दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून झुडपी जंगलाची जमीन पात्र लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यासाठी  नियमानुकुल कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ही कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिबीर आयोजित करावे, जिल्ह्यांनी एक उदिष्ट निश्‍चित करून दर आठवड्याला जास्तीत-जास्त प्रस्ताव प्रमाणित करून वन विभागाला पाठवावे. वनविभागानेही या प्रस्तावांवर विहित कार्यपद्धतीनुसार आवश्यक मंजुरी द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आमदार नितीन राऊत आणि आमदार चरणसिंग ठाकूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते.

COMMENTS