नंदूरबारमध्ये नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईनंदुरबार : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले असून, विद्युत

नंदूरबारमध्ये नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
नंदुरबार : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले असून, विद्युत विभागातील उपअभियंत्याला तब्बल 8 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करून प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडवून दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेत कार्यरत असलेले उपअभियंता नितीन इंगळे यांनी एका ठेकेदाराकडून लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये एलईडी सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम तक्रारदारांच्या फर्मला मंजूर झाले होते. जीएसटी वगळता 2 कोटी 37 लाख 29 हजार 356 रुपयांची निविदा मंजूर होऊन कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. संबंधित कामे मुदतीत पूर्ण करण्यात आली. मार्च 2025 मध्ये 41 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते. त्या वेळी उपअभियंता नितीन इंगळे याने 80 हजार रुपये स्वीकारून उर्वरित रक्कम पुढील बिलावेळी देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2025 मध्ये उर्वरित कामाचे 2 कोटी 2 लाख 5 हजार 525 रुपये तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर उपअभियंत्याने बिल अदा केल्याच्या मोबदल्यात 8 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितली. पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर सह्या करणार नसल्याचेही सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर -उइने सापळा रचला. तडजोडीअंती उपअभियंत्याने 8 लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य केलं. संबंधित ठेकेदाराने सुमारे 41 कोटी रुपयांचे काम पूर्ण केल्यानंतर पहिल्या देयकास मंजुरी देण्यासाठी इंगळे यांनी 8.50 लाख रुपयांची लाच मागितली होती.

COMMENTS