Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक, शस्त्रसाठा जप्त

इम्फाळ : दीर्घकाळापासून हिंसाचाराने त्रस्त असलेल्या मणिपूर राज्यात पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी अतिरेकी कारवायांवर कठोर पावले उचलली आहेत. बेकायदेशीर शस्

तमिळनाडूतून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक
हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्याला जन्मठेप
दिल्ली स्फोटात दहशतवाद्यांकड होतेे ‘घोस्ट सिम’

इम्फाळ : दीर्घकाळापासून हिंसाचाराने त्रस्त असलेल्या मणिपूर राज्यात पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी अतिरेकी कारवायांवर कठोर पावले उचलली आहेत. बेकायदेशीर शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमांदरम्यान तीन सक्रिय दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात यश आले आहे. तसेच हिंसाचारग्रस्त भागात अडकलेल्या दोन नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
मणिपूर पोलिस मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोमवारी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील लामलाई पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील न्गारू चेंगजेल टेकडी परिसरातील नोंगदाम गावात सुरक्षा दलांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यात मॅगझिनसह. 303 रायफल, 12 बोअरच्या दोन एकनळी बंदुका, मॅगझिनसह चार 9 मिमी पिस्तूल तसेच क्रमांक 36 चे तीन हातगोळे (हँडग्रेनेड) यांचा समावेश आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. इम्फाळ पश्‍चिम जिल्ह्यातील सिंगजामेई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लिलोंग चाजिंग परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा तपास करत असताना मोठी माहिती समोर आली. या तपासाच्या आधारे ‘केसीपी (अपुनबा)’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सक्रिय सदस्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे लैशराम बुलु सिंह (वय 39), पुयामाचा डेविड (वय 22) आणि निंगथौजम चलम्बा सिंह (वय 29) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून एक चारचाकी वाहन (मारुती जिप्सी), एक .45 पिस्तूल, मॅगझिनसह 17 जिवंत काडतुसे, तीन मोबाईल दूरध्वनी, रोख रक्कम, पाकीट तसेच आधार कार्डसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी अशा मोहिमा पुढेही अधिक तीव्र केल्या जातील, असा ठाम इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS