Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरोडा नाका परिसरातील एटीएम फोडीचा प्रयत्न हाणून पाडला

एक आरोपी रंगेहात अटकेत, 1.06 लाखांचा मुद्देमाल जप्तनांदेड । प्रतिनिधीशहरातील तरोडा नाका परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या धाडसी प्रकारात दोन ब

नांदेडमध्ये पीएम विश्‍वकर्मा प्रदर्शनीची ‘कलाकुसर’
Nanded : गुरफळीचे दुग्ध व्यावसायिक करतायेत नदीतून प्रवास (Video)
मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी

एक आरोपी रंगेहात अटकेत, 1.06 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड । प्रतिनिधी
शहरातील तरोडा नाका परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या धाडसी प्रकारात दोन बँकांचे एटीएम फोडून रक्कम चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रसंगावधान राखत कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला. एटीएम फोडताना एका चोराला रंगेहात पकडण्यात आले असून, त्याच्याकडून दुचाकी व साहित्य असा एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास तरोडा नाका परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे हे सहकार्‍यांसह नियमित गस्तीवर होते. यावेळी पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये संशयास्पद हालचाल दिसून आली. जवळ जाऊन पाहणी केली असता एक इसम एटीएम फोडून आतील रक्कम काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या इसमाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव राम मोहन कुरे (वय 26, रा. गागलेगाव, ता. बिलोली) असे आहे. चौकशीदरम्यान कुरे याने याच परिसरातील कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. मात्र, दोन्ही एटीएममधून त्याला प्रत्यक्ष रक्कम काढण्यात यश आले नाही. तरीही, एटीएम फोडण्यासाठी वापरलेले साहित्य व घटनास्थळी वापरलेली दुचाकी असा एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्यासह पोलिस जमादार रविशंकर बामणे, चंद्रकांत स्वामी, शेख अझरोद्दीन, अनिल बिरादार, उमर शेख आणि सुधाकर देवकत्ते यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राम मोहन कुरे याच्याविरोधात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने यापूर्वी आणखी कुठे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली आहे. या घटनेमुळे शहरातील एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांची तत्परता मात्र नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.

COMMENTS