अकोले : तालुक्यातील राजूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे मयत खातेदार सभासदांच्या वारसाला दोन लाखांची मदत देण्यात आली. मयत फसाबाई भीमा धिंदळे (रा. शिरपुंजे. ता. अकोले) यांच्या प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेच्या पॉलिसीचा दावा निकाली काढण्यात आला आहे. त्यांचे वारस भीमा महादु धिंदळे यांना 2 लाखांची आर्थिक मदत मंजूर करून त्यांच्या एसबीआय बँकेच्या बचत खात्यात वर्ग करण्यात आली आहे. वारस भीमा धिंदळे यांनी शाखेतील सर्व कर्मचारी व त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी शाखा अधिकारी दिलीप घुले, सहायक अधिकारी अजय काळे, तसेच कर्मचारी उपस्थित होते. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना असून 18 ते 50 वर्ष वयोगटातील नागरिकांना दोन लाख रुपयाचा जीवन विमा कव्हर प्रदान करते.

अकोले : तालुक्यातील राजूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे मयत खातेदार सभासदांच्या वारसाला दोन लाखांची मदत देण्यात आली. मयत फसाबाई भीमा धिंदळे (रा. शिरपुंजे. ता. अकोले) यांच्या प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेच्या पॉलिसीचा दावा निकाली काढण्यात आला आहे. त्यांचे वारस भीमा महादु धिंदळे यांना 2 लाखांची आर्थिक मदत मंजूर करून त्यांच्या एसबीआय बँकेच्या बचत खात्यात वर्ग करण्यात आली आहे. वारस भीमा धिंदळे यांनी शाखेतील सर्व कर्मचारी व त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
यावेळी शाखा अधिकारी दिलीप घुले, सहायक अधिकारी अजय काळे, तसेच कर्मचारी उपस्थित होते. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना असून 18 ते 50 वर्ष वयोगटातील नागरिकांना दोन लाख रुपयाचा जीवन विमा कव्हर प्रदान करते.

COMMENTS