Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलवाडा गाव तलाव संरक्षण प्रकरण: तिसरी नोटीस देण्यात विलंब, आंदोलनकर्‍यांचा रोष

गेवराई । । प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील तलवाडा गावातील गाव तलाव संरक्षणासाठी उभारलेल्या भीती लगटच्या आतिक्रमणाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदा

गेवराईत ‘मूकनायक व दर्पण दिना’ निमित्त जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजन
भागूजीराव ढेकळे विद्यालयात इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
विज्ञानामुळे अज्ञान आणि अंधश्रद्धा यावर विजय मिळवता येतो-डॉ.सुधिर येवले

गेवराई । । प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील तलवाडा गावातील गाव तलाव संरक्षणासाठी उभारलेल्या भीती लगटच्या आतिक्रमणाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी शेख खिजर जैनोदीन व जयदेव शिंगणे हे गेल्या वर्षभर सातत्याने आंदोलन करत आहेत. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत संबंधित आतिक्रमकांना दोन नोटीसा दिल्या असून, आतिक्रमण स्वतःहून काढण्यास सांगितले होते.
तथापि, तिसरी नोटीस देण्यात विलंब का झाला? हा प्रश्न उपयुक्त ठरत आहे. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तलवाडा गाव तलावात जलसमाधी आंदोलनाच्या वेळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते की, एक महिन्याच्या आत तिसरी नोटीस देऊन आतिक्रमण काढण्यात येईल, परंतु अर्धा कालावधी उलटत आला तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. यामुळे आंदोलनकर्‍यांचा रोष वाढला असून, तलवाडा ग्रामपंचायतचे प्रशासक चोपडे व ग्रामविकास अधिकारी मुसळे यांनी आंदोलनकर्‍यांवर दडपशाही करण्याचा इरादा धरल्याचा आरोप शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.  स्थानिक नागरिकांमध्ये देखील प्रशासनाच्या ढिलाईविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे. आंदोलनकर्‍यांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने नियमबद्ध पद्धतीने नोटीसा देऊन आतिक्रमण काढावे; अन्यथा या प्रकरणाची तक्रार उच्च अधिकार्‍यांकडे केली जाईल. ग्रामपंचायत व संबंधित प्रशासन यांचे पुढील पाऊल या प्रकरणात स्थानीय लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.

COMMENTS