Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘परिक्रमा’मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

श्रीगोंदा : परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, काष्टी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘उडान २०२६’  जल्लोषात पार पडला. ‘उडान २०२६’ हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा २७ जानेवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडला. या दरम्यान क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच ट्रॅडिशनल डे, बॉलीवूड व रेट्रो डे, ट्विन्स डे असे थीम डे, रांगोळी, मेहंदी आणि रील्स स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. ‘आनंदनगरी’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून उद्योजकतेचे प्राथमिक धडे घेतले. कार्यक्रमाची सुरुवात परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक व माजी मंत्री बबन पाचपुते यांच्या हस्ते झाली. यावेळी आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या अध्यक्षा, व्यवस्थापन मंडळ सदस्य, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ‘उडान २०२६’ स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांना नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी ऊर्जा दिली असून परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टीट्युशन्सच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला अधिक बळ मिळाले आहे. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कन्या विद्यालयात माजी विद्यार्थिनींचा मेळावा उत्साहात
कला कधीच उपाशी राहू देत नाही : प्रा.  सोनवणे
पोदार लर्न स्कूलची ‘डीएसओ’ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

श्रीगोंदा : परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, काष्टी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘उडान २०२६’  जल्लोषात पार पडला. ‘उडान २०२६’ हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा २७ जानेवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडला. या दरम्यान क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच ट्रॅडिशनल डे, बॉलीवूड व रेट्रो डे, ट्विन्स डे असे थीम डे, रांगोळी, मेहंदी आणि रील्स स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. ‘आनंदनगरी’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून उद्योजकतेचे प्राथमिक धडे घेतले.

कार्यक्रमाची सुरुवात परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक व माजी मंत्री बबन पाचपुते यांच्या हस्ते झाली. यावेळी आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या अध्यक्षा, व्यवस्थापन मंडळ सदस्य, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ‘उडान २०२६’ स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांना नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी ऊर्जा दिली असून परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टीट्युशन्सच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला अधिक बळ मिळाले आहे. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS