Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमरीत शिवजन्मोत्सव निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन

अखंड हरिनाम सप्ताह, भव्य बैलगाडा शर्यत, पालखी सोहळ्याची रेलचेलमाजलगाव । प्रतिनिधीतालुक्यातील उमरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सवानिमित्त

आदित्य पॉलीटेक्निकच्या दोन विद्यार्थींची भारतीय नौदलात निवड
नवगण महाविद्यालयात राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा
संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

अखंड हरिनाम सप्ताह, भव्य बैलगाडा शर्यत, पालखी सोहळ्याची रेलचेल
माजलगाव । प्रतिनिधी
तालुक्यातील उमरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, भव्य बैलगाडा शर्यत, तसेच पालखी सोहळा अशा विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. गावातील उमरेश्वर मंदिर परिसरात कीर्तन, भजन,  यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचा अखंड हरिनाम सप्ताह  आयोजनही करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील आकर्षण असलेली भव्य बैलगाडा शर्यत हा या उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे. शर्यतीसाठी परिसरातील तसेच इतर मराठवाड्यातील बैलगाडा मालक व शौकिन मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली असून शर्यतीमुळे उमरी परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याशिवाय पारंपरिक वेशभूषेत निघणारा पालखी सोहळा गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात येणार असून ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात हा सोहळा पार पडणार आहे. ग्रामस्थ, युवक मंडळे व महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात अपेक्षित आहे. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी तसेच बैलगाडा प्रेमींनी शर्यतीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या निमित्ताने उमरी गावात धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक वारशाचा संगम पाहायला मिळणार असून उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
दि.9 ते 16 फेब्रुवारी अखंड हरिनाम सप्ताह,17 फेब्रुवारी रोजी भव्य बैलगाडा शर्यत,18 फेब्रुवारी रोजी भव्य शिवचरित्र व्याख्यान, 19 फेब्रुवारी रोजी ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पालखी सोहळा व स्नेहभोजन असी कार्यक्रमाची रूपरेषा आसेल.

COMMENTS