अर्धापूर । प्रतिनिधी अर्धापूर तालुक्यातील लहान-आंबेगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून पोलीस पाटील आनंद इंगळे यांच्या तत्परतेम
अर्धापूर । प्रतिनिधी
अर्धापूर तालुक्यातील लहान-आंबेगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून पोलीस पाटील आनंद इंगळे यांच्या तत्परतेमुळे त्याला ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
इंडस मोबाईल टॉवर कंपनीचे कर्मचारी कृष्णा बाबुराव सूर्यवंशी (वय 40, रा. शेवाळा, जि. हिंगोली) हे दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी दुचाकीने जात असताना रानडुक्करांच्या कळपामुळे अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील आनंद इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शासकीय रुग्णवाहिकेची वाट न पाहता खाजगी वाहनाने जखमीस नांदेड येथील तुकामाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणीत त्यांच्या फुफ्फुसाला गंभीर दुखापत व खांद्याला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. वेळीच उपचार मिळाल्याने जखमीची प्रकृती स्थिर असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलीस पाटील आनंद इंगळे यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांकडून कौतुक व्यक्त होत आहे.

COMMENTS