Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस. एस. पाटील यांची ‘बालभारती’ पाठ्यपुस्तक निर्मिती समितीवर निवड

माहूर । प्रतिनिधीमाहूर तालुक्यातील नवी आबादी, माहूर येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील व कार्यक्षम शिक्षक शेषराव एस. पाटील यांची महाराष्ट्र राज्य

केसुला बहुउद्देशीय संस्थेतर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
श्री रेणुका देवी संस्थानला एका महिन्यात 1 कोटी 14 लाखांहून अधिकचे विक्रमी उत्पन्न
माहूरच्या रेणुका मातेचे साक्षात रूप म्हणजे बालमटाकळीची श्री बालांबिका देवी (Video)

माहूर । प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील नवी आबादी, माहूर येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील व कार्यक्षम शिक्षक शेषराव एस. पाटील यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) यांच्या वतीने गठित करण्यात आलेल्या समीक्षण समितीवर निवड करण्यात आली आहे.
बालभारतीच्या विशेष विषयाधिकारी (भाषा)  सविता वायाळ यांनी अधिकृत पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) 2025 अंतर्गत प्रथम मराठी ‘बालभारती’ इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम सुरू असून, या पाठ्यपुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समीक्षण समितीवर एस. एस. पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, तसेच बाबुराव माडगे, उत्तम कानिंदे, मिलिंद कंधारे, बालभारती सदस्य रमेश मुनेश्वर, मिलिंद जाधव, मुख्याध्यापक संजीव वाठोरे, भाग्यवान भवरे, रणजित वर्मा, मुख्याध्यापिका ललिता जोशी,  आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS