Homeताज्या बातम्यादेश

लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

भारत-अमेरिका व्यापार करारावरून पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजीनवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी लोकसभेत विरोधकांच्या घोषणाबाजी

मुंबईत सभा; भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात किसान सभेची ‘आरपार’ आंदोलनाची घोषणा
भारत-अमेरिका कराराविरोधात काँगे्रस आक्रमक
भारताच्या हिताशी कदापी तडजोड नाही

भारत-अमेरिका व्यापार करारावरून पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी लोकसभेत विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामकाज सतत विस्कळीत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिका-भारत व्यापार कराराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार गदारोळ घातला. परिणामी, सकाळी 11 वाजता सुरू झालेले कामकाज अवघ्या काही मिनिटांत तहकूब करावे लागले.
पहिल्यांदा सभागृह फक्त आठ मिनिटे चालल्यानंतर ते दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या कामकाजातही अवघ्या 13 मिनिटांतच गदारोळ उफाळून आल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले. अध्यक्षांनी घोषणाबाजी नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करत विरोधकांना संयम राखण्याचे आवाहन केले, मात्र त्यानंतरही गोंधळ कायम राहिला. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांसोबत स्वतंत्र बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विरोधी खासदारांनी संसद भवनाबाहेरही अमेरिका-भारत व्यापार कराराच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
दरम्यान, एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे अमेरिकेशी झालेल्या व्यापार कराराबद्दल अभिनंदन करण्यात आले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हा करार ऐतिहासिक असल्याचे सांगत विरोधकांवर अनावश्यक गोंधळ घालण्याचा आरोप केला. राहुल गांधींनी चर्चेत व्यत्यय आणू नये, अशी टीकाही त्यांनी केली. एकीकडे सत्ताधारी पक्ष कराराचे समर्थन करत असताना, दुसरीकडे विरोधक स्पष्टता आणि चर्चा मागत असल्याने लोकसभेतील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत शिवसेना खासदार मिलिंद देवरा म्हणाले, पीएम मोदींनी बैठकीत सर्व खासदारांना सांगितले की सरकार प्रत्येक निर्णयात भारताच्या हितासाठी काम करते, मग तो व्यापार करार असो किंवा अर्थसंकल्प. देवरा म्हणाले, भारत-अमेरिका आणि भारत-युरोप व्यापार करारांचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते. हे त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचे परिणाम आहे. या व्यापार करारामुळे लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना फायदा होईल. तर दुसरीकडे काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, अलिकडच्या घटनांवरून असे दिसते की भारताची राजधानी नवी दिल्लीहून वॉशिंग्टन डीसीला हलवण्यात आली आहे आणि पंतप्रधान मोदी दीर्घ सुट्टीवर गेले आहेत. आम्हाला वॉशिंग्टन डीसी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताच्या सर्व निर्णयांची माहिती मिळत आहे, जे स्वतः घोषणा करत आहेत.

अमेरिका-भारत व्यापार करारावर मतभेद
विरोधकांनी या कराराच्या अटींबाबत सरकारकडून स्पष्ट माहिती मागितली आहे. काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी या करारामुळे भारतीय शेतकर्‍यांचे नुकसान होईल, असा आरोप करत सरकारवर टीका केली. अमेरिकन कृषी उत्पादने शुल्कमुक्त आयातीच्या माध्यमातून देशांतर्गत बाजारात आणली जाणार असल्यास शेतकर्‍यांचे भवितव्य काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही कराराच्या तपशीलांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत संसदेला संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली. जर करार देशहिताचा असेल, तर विरोधक त्याचे स्वागतच करतील. मात्र सरकारने आधी स्पष्टता द्यावी, असे त्यांनी म्हटले.

विरोधी पक्षातील 8 खासदार निलंबित
लोकसभाध्यक्षांच्या दिशेने कागद फेकल्याप्रकरणी आठ विरोधी पक्षांच्या खासदारांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी संबंधित आठ खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. या खासदारांनी स्पीकरांच्या आसनाजवळ जाऊन कागदांचे तुकडे फेकले होते. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये गुरजीत औजला, मणिकम टागोर (तमिळनाडूतील काँग्रेस खासदार), राजा वडिंग, किरण कुमार रेड्डी, डीन कुरियाकोस (केरळमधील काँग्रेस खासदार), एस. वेंकटेश (सीपीएम खासदार), हिबी ईडन (केरळमधील काँग्रेस खासदार) यांचा समावेश आहे.

COMMENTS