Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोकनगर येथे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

राहुल भैय्या सोनवणे यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना; गंगामाऊली शुगर परिसरात शोककळाकेज । प्रतिनिधीगंगामाऊली शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, अशोकनगर (ता.

आशुतोष पठ्ठ्या कामाला माझ्यासारखाच
अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा यांचे आवाहन
अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही तर दिल्लीश्‍वरांची इच्छा

राहुल भैय्या सोनवणे यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना; गंगामाऊली शुगर परिसरात शोककळा
केज । प्रतिनिधी
गंगामाऊली शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, अशोकनगर (ता. केज) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांना अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या निमित्ताने कारखान्याच्या मुख्य प्रांगणात शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
या शोकसभेला गंगामाऊली शुगरचे उपाध्यक्ष हनुमंत काका मोरे, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले. शोकसभेत बोलताना राहुल भैय्या सोनवणे म्हणाले, स्व. अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि सहकार क्षेत्रातील एक कणखर नेतृत्व हरपले आहे. त्यांची कार्यपद्धती, स्पष्ट भूमिका आणि विकासाची दृष्टी नेहमीच प्रेरणादायी राहील. शोकसभेदरम्यान उपस्थितांनी स्व. दादांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण अशोकनगर परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये शोकभावना व्यक्त होत आहे.

COMMENTS