अकोलेत उपमुख्यमंत्री स्व.पवारांच्या आठवणींना उजाळा ; कडकडीत बंद अकोले : अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघाताने बारामतीत दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक अकाली जाण्याने कोतूळ परिसरात तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. येथे गुरुवारी सकाळी सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यावेळी कोतुळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी शोकसभा घेतली या सभेत अनेकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुळा नदीत पाणी उपलब्ध नसताना पिंपळगाव खांड धरणाच्या कामाला शासनाची मंजुरी अजित पवार यांनी कशी मिळून दिली आणि पिंपळगाव खांड धरणामुळे परिसराची शेती कशी फुलली यावर प्रकाश टाकला. आंबित धरण, पळसुंदे धरण, येसरठाव धरण, या परिसरातील धरणांसाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या माध्यमातून मुळा परिसराच्या विकासाला लाभलेले अजित पवारांचे योगदान याची आठवण करून दिली. राज्यातील सत्ता परिवर्तन नंतर अजित पवारांच्या माध्यमातून अकोले तालुक्यात आमदार डॉ. किरण लाहमटे यांनी केलेल्या विकास कामांचा उल्लेख यावेळी करण्यात आला. अनेक वेळा विकास कामांचे भूमिपूजन,उद्घाटन, शेतकरी मेळावे, प्रचारसभा, या निमित्ताने अजितदादांच्या अकोल्यात येण्याच्या अनेक घटनाक्रमांना यावेळी उजाळा देण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, अगस्तीचे संचालक मनोज देशमुख, माजी संचालक बाळासाहेब देशमुख, भाजपाचे सोमदास देशमुख, कोतुळ चे माजी सरपंच राजू पाटील देशमुख, अकोले तालुका वारकरी संघटनेचे

अकोलेत उपमुख्यमंत्री स्व.पवारांच्या आठवणींना उजाळा ; कडकडीत बंद
अकोले : अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघाताने बारामतीत दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक अकाली जाण्याने कोतूळ परिसरात तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. येथे गुरुवारी सकाळी सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यावेळी कोतुळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी शोकसभा घेतली या सभेत अनेकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुळा नदीत पाणी उपलब्ध नसताना पिंपळगाव खांड धरणाच्या कामाला शासनाची मंजुरी अजित पवार यांनी कशी मिळून दिली आणि पिंपळगाव खांड धरणामुळे परिसराची शेती कशी फुलली यावर प्रकाश टाकला. आंबित धरण, पळसुंदे धरण, येसरठाव धरण, या परिसरातील धरणांसाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या माध्यमातून मुळा परिसराच्या विकासाला लाभलेले अजित पवारांचे योगदान याची आठवण करून दिली. राज्यातील सत्ता परिवर्तन नंतर अजित पवारांच्या माध्यमातून अकोले तालुक्यात आमदार डॉ. किरण लाहमटे यांनी केलेल्या विकास कामांचा उल्लेख यावेळी करण्यात आला.
अनेक वेळा विकास कामांचे भूमिपूजन,उद्घाटन, शेतकरी मेळावे, प्रचारसभा, या निमित्ताने अजितदादांच्या अकोल्यात येण्याच्या अनेक घटनाक्रमांना यावेळी उजाळा देण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, अगस्तीचे संचालक मनोज देशमुख, माजी संचालक बाळासाहेब देशमुख, भाजपाचे सोमदास देशमुख, कोतुळ चे माजी सरपंच राजू पाटील देशमुख, अकोले तालुका वारकरी संघटनेचे


COMMENTS