Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

के.जे.सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात

कोपरगाव : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यशास्त्र विभाग, सामाजिक शास्त्र मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी मतदान करणे हे आपले सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे सांगितले. देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, अखंडता आणि एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मतदार दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांनी निवडणुकांमध्ये आपला सहभाग नोंदवायला पाहिजे. तरुण व नवमतदार हे चाणाक्ष उत्साही असतात. त्यामुळे त्यांनी आपले नाव निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत नोंदवुन मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्रदर्शित केलेल्या मतदार ज़नजागृती भित्तिपत्रकांचे अनावरण प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश  देवरे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची पार्श्वभूमी नमूद करून २५ जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस असल्याचे म्हटले. या कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेना विभागातील अनेक छात्र सैनिकांनी आपली मनोगते व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय दवंगे यांनी केले तर आभार डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.एन.जी.शिंदे, डॉ.एम.बी.खोसे, प्रा.वर्षा आहेर, डॉ.डी.पी.बागुल व विभागीय प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

शंभर टक्के निकाल; रेखाकला परीक्षेत ‘आत्मा मालिक’चे 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत
नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करा : बोरावके 
एसएसजीएम कॉलेजमध्ये सब-ज्युनिअर मैदानी स्पर्धांना सुरवात

कोपरगाव : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यशास्त्र विभाग, सामाजिक शास्त्र मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी मतदान करणे हे आपले सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे सांगितले.

देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, अखंडता आणि एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मतदार दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांनी निवडणुकांमध्ये आपला सहभाग नोंदवायला पाहिजे. तरुण व नवमतदार हे चाणाक्ष उत्साही असतात. त्यामुळे त्यांनी आपले नाव निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत नोंदवुन मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्रदर्शित केलेल्या मतदार ज़नजागृती भित्तिपत्रकांचे अनावरण प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश  देवरे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची पार्श्वभूमी नमूद करून २५ जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस असल्याचे म्हटले. या कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेना विभागातील अनेक छात्र सैनिकांनी आपली मनोगते व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय दवंगे यांनी केले तर आभार डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.एन.जी.शिंदे, डॉ.एम.बी.खोसे, प्रा.वर्षा आहेर, डॉ.डी.पी.बागुल व विभागीय प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS