कर्जत : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कर्जत तालुका शिवसेना व युवा स

कर्जत : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कर्जत तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक तथा माजी प्राचार्य गजानन चावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल व संघचालक गजानन चावरे यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना संघचालक गजानन चावरे म्हणाले, सामान्य माणसाच्या मनामध्ये हिंदुत्वाची ज्योत पेटवणारे, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा आत्मविश्वास देणारे असामान्य नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे.” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
तालुकाप्रमुख डॉ.नितीन तोरडमल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नेतृत्व या देशात पुन्हा कधीच निर्माण होणार नाही. आज राज्यातील विविध राजकीय पक्षांमध्ये असलेले अनेक नेते हे खऱ्या अर्थाने शिवसेनेत आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या मुशीत घडलेले आहेत. त्यांचे धगधगते विचार आजही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.” या कार्यक्रमात नामदेव राऊत, अशोक खेडकर, सचिन पोटरे, दादासाहेब सोनमाळी, बापूसाहेब नेटके, अनिल गदादे, अंगद रुपनर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

COMMENTS