Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाईकरांना मोठा दिलासा: नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडांकडून पाणीपुरवठा सुधारणा

अंबाजोगाई । प्रतिनिधीनिवडणूक काळात दिलेले आश्वासन फक्त शब्दापुरते न राहता नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी प्रत्यक्षात उतरवले असून, अंबाजोगाईकरांन

अंबाजोगाईत कंत्राटी कामगारांचा वेतनवाटप
अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची प्रेरणादायी जीवनगाथा
जनसामान्यांच्या समस्यांना ‘काकाजी’ मुंदडांचा पाठिंबा
nandkishor mundada

अंबाजोगाई । प्रतिनिधी
निवडणूक काळात दिलेले आश्वासन फक्त शब्दापुरते न राहता नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी प्रत्यक्षात उतरवले असून, अंबाजोगाईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात पूर्वी 12 ते 13 दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा आता सहाव्या दिवशी थेट उपलब्ध होतोय.
पदभार स्वीकारताच नगराध्यक्षांनी पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेतली. तांत्रिक अडचणींचा आढावा घेऊन कर्मचार्‍यांना योग्य सूचना दिल्या गेल्या. यामुळे वितरणाचे नवीन नियोजन राबवले गेले आणि शहराचा पाणीपुरवठा कालावधी निम्म्याने कमी झाला. सध्या तांत्रिक अडचणींमुळे चोबारा भागात पाणी सात दिवसांनी मिळते, मात्र नगराध्यक्षांच्या म्हणण्यानुसार ही समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. नगराध्यक्षांनी पाणीपुरवठ्याचा कालावधी आणखी कमी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासोबतच शहराच्या स्वच्छता, दिवाबत्ती आणि प्रशासनिक कार्यक्षमतेवरही भर देण्यात येत आहे. कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. नगर पालिका कर्मचार्‍यांना वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक केले असून नागरिकांची कामे खोळंबणार नाही याची काळजी घेतली जात आहे. आम्ही दिलेल्या वचनानुसार पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी केला आहे. वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाला तरच एखादा दिवस मागे-पुढे होईल, अन्यथा अंबाजोगाईकरांना नियमित पाणी मिळेल. अंबाजोगाईकरांनी नगराध्यक्षांच्या या वेगाने घेतलेल्या उपाययोजनांचे स्वागत केले असून, शहराच्या विकासासाठी नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

COMMENTS