Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी

लंडनला जाण्यापासून रोखले; चौकशीत विमान चुकलेमुंबई : भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले डॉ. संग्राम पाटील यांना सोमवारी पुन्हा एकदा मुंबई आंतरराष्

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची दोरी राज्यपालांच्या हाती
“पुष्पा” अवतरला नगरमध्ये ; चंदनाची वाहतूक: दोघांच्या क्राइम ब्रँचने आवळल्या मुसक्या | LOKNews24
विद्युत सहायकपदाच्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी

लंडनला जाण्यापासून रोखले; चौकशीत विमान चुकले
मुंबई : भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले डॉ. संग्राम पाटील यांना सोमवारी पुन्हा एकदा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौकशीसाठी थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेमुळे त्यांचे लंडनला जाणारे नियोजित विमान सुटले असून, त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले डॉ. संग्राम पाटील सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहेत. 10 जानेवारी रोजी ते कुटुंबासह भारतात आले असता, मुंबई विमानतळावर त्यांची दीर्घ चौकशी करण्यात आली होती. त्या वेळी संपूर्ण दिवस त्यांना विमानतळावर थांबवण्यात आले आणि सायंकाळी उशिरा त्यांची सुटका करण्यात आली होती. सोशल मीडियावरील एका पोस्टच्या अनुषंगाने ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
दरम्यान, 19 जानेवारी रोजी डॉ. पाटील हे कुटुंबासह लंडनला परतण्यासाठी निघाले होते. त्यांनी याबाबत आधीच तपास अधिकार्‍यांना माहिती दिली होती. त्यांच्या मते, त्यावेळी संबंधित लूक आऊट सर्क्युलर मागे घेतले जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळी सुमारे 8 वाजता इंडिगोच्या विमानाने ब्रिटनला जाण्यासाठी ते मुंबई विमानतळावर पोहोचले. मात्र इमिग्रेशन काउंटरवरच त्यांना अडवण्यात आले. चौकशी सुरू असतानाच त्यांचे लंडनचे विमान सुटले. त्यामुळे नियोजित प्रवास रखडला. माहितीनुसार, डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या आधारे त्यांच्या नावावर लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले असल्याचे सांगितले जाते. भाजप व पक्षाच्या काही नेत्यांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या सोशल मीडिया सहसंयोजक निखिल श्यामराव भामरे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. या तक्रारीनंतर संबंधित गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, परदेशी नागरिक असलेल्या डॉ. पाटील यांना वारंवार चौकशीसाठी थांबवले जात असून, त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध येत असल्याने हा विषय अधिक गंभीर ठरत आहे. या प्रकरणाकडे आता राजकीय तसेच कायदेशीर दृष्टिकोनातूनही लक्ष वेधले जात आहे.

COMMENTS