सेन्सेक्स 300 अंकांनी घसरून 83,250 वरमुंबई : आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी, सोमवार (19 जानेवारी) रोजी देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीचे वाताव

सेन्सेक्स 300 अंकांनी घसरून 83,250 वर
मुंबई : आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी, सोमवार (19 जानेवारी) रोजी देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीचे वातावरण दिसून आले. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 300 अंकांनी घसरून 83,250 च्या आसपास व्यवहार करत होता. त्याचवेळी निफ्टीतही जवळपास 100 अंकांची घसरण नोंदवली गेली असून तो 25,600 च्या पातळीवर घसरला होता.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्समध्ये मर्यादित वाढ दिसून आली, तर उर्वरित 16 शेअर्स दबावाखाली होते. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि खउखउख बँक या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेल्याने निर्देशांकावर अतिरिक्त ताण आला. जागतिक बाजारातही संमिश्र चित्र दिसून येत आहे. आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सुमारे 0.96 टक्क्यांनी घसरत 4,887 वर व्यवहार करत होता, तर जपानचा निक्केई निर्देशांक जवळपास 0.97 टक्क्यांची घसरण नोंदवत 53,412 वर होता. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक सुमारे 0.99 टक्क्यांनी खाली येत 26,578 वर पोहोचला, तर चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक मर्यादित वाढीसह 4,107 च्या पातळीवर व्यवहार करत होता. अमेरिकन बाजारातही मागील सत्रात दबाव पाहायला मिळाला. 16 जानेवारी रोजी डाऊ जोन्स निर्देशांक 0.17 टक्क्यांनी घसरून 49,359 वर बंद झाला होता. नॅसडॅक आणि डझ-500 निर्देशांकातही किरकोळ घसरण नोंदवली गेली होती. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्रीचा ओघ कायम असल्याचे चित्र आहे. 16 जानेवारी रोजी परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 4,346 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. याच काळात देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी मात्र सुमारे 3,935 कोटी रुपयांची खरेदी करत बाजाराला काहीसा आधार दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार (16 जानेवारी) रोजी शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. त्या दिवशी सेन्सेक्स 187 अंकांनी वाढून 83,570 वर बंद झाला होता, तर निफ्टीत 28 अंकांची वाढ होऊन तो 25,694 च्या पातळीवर स्थिरावला होता.

COMMENTS