Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निकाल अपेक्षेनुसारच विजय महायुतीचाच!

नांदेड । प्रतिनिधी राज्यभरातील महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी महायुती सरकारच्या कामगिरीवर मतदारांनी स्पष्टपणे विश्वासाची मोहो

राज्यातील 15 महापालिकेत महिलाराज !
धनशक्तीच्या दबावासमोरही शिवसेनेची लढत अखंड
पराभवाने खचायचे नाही, काम सुरूच ठेवायचे : अजित पवार

नांदेड । प्रतिनिधी

राज्यभरातील महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी महायुती सरकारच्या कामगिरीवर मतदारांनी स्पष्टपणे विश्वासाची मोहोर उमटवली आहे. अपेक्षेप्रमाणेच विजय महायुतीचाच झाला असून, हा कौल म्हणजे सुयोग्य प्रशासन, विकासाभिमुख धोरणे आणि लोकाभिमुख निर्णयांना मिळालेली पावती असल्याचे राजकीय विश्लेषक तथा भाजपाचे युवा कार्यकर्ते अरुण पोपळे यांनी व्यक्त केले आहे.

नांदेड महानगरपालिका निकालाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून सांगितले , मतदानापूर्वीच मतदारांचा कौल आपल्या बाजूने लागेल, याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास होता आणि तो निकालांतून अधोरेखित झाला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कार्याध्यक्ष नितीन नबीन तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या शिलेदारांनी हा विजय साकार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विजयाचे निःसंशय शिल्पकार असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याने विकासाची नवी दिशा पकडल्याचा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री तथा मनपा निवडणूक प्रमुख खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते यांच्या टीमवर्कचे हे यश असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत भाजपाला व महायुतीला कौल देणार्‍या सर्व मतदारांचे आभार मानण्यात आले असून, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. हा विजय म्हणजे केवळ राजकीय यश नसून, आगामी काळात अधिक वेगाने विकास साधण्याची जबाबदारीही वाढवणारा असल्याचे मत व्यक्त होत आहे.

COMMENTS