Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात भाजपच ठरला पुन्हा ’धुरंधर’ !

मुंबई, अहिल्यानगरसह 22 महापालिकेवर महायुतीची सत्ताठाकरे बंधूंचा करिश्मा मुंबईत ठरला अपयशी; मुंबईत काँगे्रसची भूमिका ठरली कळीचीमुंबई/पुणे ः राज्यात

नांदेडमध्ये विकास, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीवर रणसंग्राम
मोठी घडामोड… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला… युतीबाबत…?
महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंद मध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये

मुंबई, अहिल्यानगरसह 22 महापालिकेवर महायुतीची सत्ता
ठाकरे बंधूंचा करिश्मा मुंबईत ठरला अपयशी; मुंबईत काँगे्रसची भूमिका ठरली कळीची
मुंबई/पुणे ः राज्यात 15 जानेवारीला 29 महानगरपालिकेसाठी मतदान पार पडल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीच भाजपने आपणच अव्वल असल्याचे सिद्ध करत सर्वच राजकीय पक्षांना धोबीपछाड दिली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचड, अहिल्यानगरसह विविध महानगरपालिकेवर महायुतीला सत्ता मिळाली आहे. 29 पैकी 22 पालिकेवर महायुतीची सत्ता आली असून चंद्रपूर आणि लातूरमध्ये काँगे्रसने यश मिळवले आहे.
पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन महायुतीने अजित पवारांना चांगलीच मात दिली आहे. त्यामुळे अहिल्यानगर वगळता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे कोणतीच महानगरपालिका नसल्याचे दिसून येत आहे.  तर दुसरीकडे मुंबईत काँगे्रस आणि वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवल्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेत 227 जागा असून सत्ता मिळवण्यासाठी 114 जागांची गरज असतांना महायुतीने 125 पेक्षत्त अधिक जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. भाजपने तब्बल 27 वर्षांनंतर सत्ता मिळवत आपला महापौर बसवणार आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, नाशिक, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वसई विरार, मीरा-भाईंदर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, पनवेल, नांदेड, सांगली, इचलकरंजी, जालना या 22 महानगरपालिकेच्या ठिकाणी महायुतीने सत्ता मिळवली


नागपूर महापालिकेवर भाजपचे वर्चस्व
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत आज सकाळी आलेल्या कलानुसार भाजपने महापालिकेवर भक्कम वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण 38 प्रभागांतील 151 पैकी 143 जागांचे कल समोर आले असून त्यामध्ये भाजप तब्बल 106 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 29 जागांवर आघाडीवर असून दुसर्‍या क्रमांकावर आहे. शिवसेना (शिंदे गट) 1 जागेवर आघाडीवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 1 जागेवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 1 जागेवर आघाडी/विजयाच्या स्थितीत आहे. एमआयएमनेही 4 जागांवर आघाडी घेत आपली उपस्थिती नोंदवली आहे. या निकालांमुळे नागपूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता जवळपास निश्‍चित मानली जात आहे.

वसई विरार महानगरपालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता
वसई-विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडी पक्षाने सर्वाधिक 71 जागावंर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. 43 जागा घेत भाजप दुसर्‍या क्रमांकावर आहे. शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. तर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांना खातेही उघडता आले नाही.

COMMENTS