Homeदखल

टग्या नामोल्लेखाची सार्थकता !

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो चिखल झाला आहे, त्याचे मुख्य सूत्रधार म्हणून अजित पवारांकडे पाहिले जाते. एकेकाळी 'स्पष्टवक्ता' म्हणून मिरवणाऱ्या

येडेश्वरी कारखाना परिसरात अजित दादांचे भव्य स्मारक उभारणार
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
अजितदादांकडे भाजपच्या कथित घोटाळ्याची फाइल होती?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो चिखल झाला आहे, त्याचे मुख्य सूत्रधार म्हणून अजित पवारांकडे पाहिले जाते. एकेकाळी ‘स्पष्टवक्ता’ म्हणून मिरवणाऱ्या या नेत्याने गेल्या काही काळातील आपल्या कृत्यांनी हे सिद्ध केले आहे की, त्यांच्यासाठी ‘तत्त्व’ आणि ‘नाते’ यापेक्षा ‘सत्ता’ आणि ‘खुर्ची’ मोठी आहे. अजित पवारांची प्रतिमा गेल्या काही वर्षांत सततच्या वादग्रस्त विधानांमुळे मलीन झाली आहे. राजकारणात भाषेचा दर्जा आणि सुसंस्कृतपणा महत्त्वाचा असतो, पण अजित पवारांच्या अनेक कृतींमधून ‘सत्तेची मस्ती’ आणि ‘लोकांप्रति अनादर’ दिसून येतो, अशी टीका वारंवार होत असते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे त्यांचे ‘ते’ विधान आजही महाराष्ट्राच्या विस्मृतीत गेलेले नाही. जनतेच्या प्रश्नांना गांभीर्याने घेण्याऐवजी थिल्लरपणाने उत्तरं देण्याची त्यांची वृत्ती एका जबाबदार नेत्याला शोभणारी नाही. जेव्हा एखादा नेता लोकांच्या दुःखाची थट्टा करतो, तेव्हा तो आपल्या पदाची प्रतिष्ठा घालवून बसतो.
      अजित पवारांची संवादाची शैली अनेकदा उद्धटपणाकडे झुकणारी असते. पत्रकारांना उत्तरे देताना किंवा कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांच्या भाषेत जो ‘रांगडेपणा’ सांगितला जातो, तो प्रत्यक्षात अनेकदा ‘अहंकार’ वाटतो. लोकशाहीत जनतेचा सेवक हा नम्र असावा लागतो, पण इथे मात्र ‘मी म्हणेन तीच पूर्व’ हा अट्टाहास जास्त दिसतो. “राजकारण हे समाजसेवेचे साधन असते, पण जेव्हा ते वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे आणि अहंकाराचे प्रदर्शन बनते, तेव्हा लोकशाहीचा दर्जा ढासळतो.”
आज इकडे तर उद्या तिकडे, या भूमिकेमुळे सामान्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. चौकशांचा ससेमिरा टाळण्यासाठी घेतलेले राजकीय निर्णय हे त्यांच्या ‘खंबीर’ प्रतिमेला तडा देणारे ठरले आहेत. अजित पवार हे विकासकामांच्या बाबतीत प्रशासनावर पकड असलेले नेते मानले जातात, मात्र, ही केवळ माध्यमांनी निर्माण केलेली हवा आहे. मात्र, त्यांचे सार्वजनिक वर्तन आणि वेळोवेळी केलेले विधानांचे ‘स्टंट्स’ पाहता, ते राजकारणाला गांभीर्याने घेण्याऐवजी एका विशिष्ट प्रकारच्या मग्रूरीत वावरतात, हेच सिद्ध होते. आज अजित पवार सत्तेत नक्कीच आहेत, पण जनतेच्या मनातील त्यांची जागा संपली आहे. “दादा शब्द पाळतात” ही त्यांची जुनी प्रतिमा आता “दादा सत्तेसाठी काहीही करतात” अशी झाली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी राजकारणाला लागलेली एक घरघर आहे. अजित पवारांनी विकासाच्या गप्पा कितीही मारल्या, तरी इतिहासात त्यांची नोंद ‘सत्तेसाठी स्वतःच्या विचारांचा आणि गुरूचा बळी देणारा नेता’ अशीच होईल. महाराष्ट्राची जनता अशा ‘थिल्लर’ आणि ‘तडजोडवादी’ राजकारणाला कधीही विसरणार नाही. सार्वजनिक व्यासपीठावरून बोलताना अजित पवारांचा तोरा नेहमीच ‘मी’पणाचा असतो. कधी अधिकाऱ्यांना दमदाटी करणे, तर कधी पत्रकारांच्या प्रश्नांना तुच्छतेने उत्तरे देणे, ही त्यांची कार्यपद्धती झाली आहे. अलीकडच्या काळात तर त्यांनी स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांवर  ज्या खालच्या थरातील टीका केली, त्यावरून त्यांच्या राजकीय वैचारिकतेचा स्तर किती खालावला आहे, हे स्पष्ट होते.
    सत्तेच्या परिघात अजित पवारांचा वावर हा नेहमीच हुकूमशाही पध्दतीचा राहिला आहे.‌ अधिकाऱ्यांशी वर्तन करताना कधीच लोकशाही पध्दतीने त्यांचे वर्तन राहिले नाही. स्वतः ला ‘टग्या’ हा योग्य नामोल्लेख त्यांनी स्वतः विषयी निवडला आहे; प्रत्यक्ष त्यांचे वर्तन लोकांना त्यांच्या टग्यापणाचा अनुभव आणून देते.
     महाराष्ट्रातील सर्व जाती समुहांना समजून घेणारे नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने प्रत्येक जाती समुहाचे राजकीय प्रतिनिधित्व महाराष्ट्रात कसे राहील याची काळजी घेतली. अगदी तळागाळातील समाज समुहातील माणसे निवडून आणताना त्यांनी जाती-पातीचा भेदभाव केला नाही.‌ अजित पवार यांना आज जे काही सत्ता पद मिळाले आहे; तेच मुळात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक राजकारणाच्या भूमिकेतून.‌ सूडाचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी कधी केले नाही. अजित पवारांशी सलोख्याचे संबंध ठेवूनही दोन वेळा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची फसवणूक केली आहे. २०१४ ला अजित पवार यांनी आवाजी मतदानाने पाठिंबा देऊन अचानक तो काढून घेणे आणि पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडूनही माघारी वळणे या दोन्ही बाबीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फसवणूक केली. परंतु, उदार आणि मोठ्या मनाचे फडणवीस यांनी या बाबी आपल्या मनात कधीच धरून ठेवल्या नाहीत; परिणामी, अजित पवार आपल्याला सत्तेत दिसताहेत.

COMMENTS