कर्जत : सिद्धार्थ बोर्डिंग कर्जत (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) या अनुदानित वसतिगृहात राहणारा व रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, कर्जत येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आजबे ओंकार सोमीनाथ याने संविधान दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर, समाज कल्याण विभाग व दिव्यांग कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल जाहीर झाला आहे. या यशाबद्दल जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, लेखाधिकारी राघवेंद्र चव्हाण, चित्रांग सुरेश सोनार, अनुदानित वसतिगृह संस्थाचालक महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब भोईटे, सिद्धार्थ बोर्डिंगचे अध्यक्ष डॉ. नितीन साळवे तसेच सर्व पदाधिकारी व कर्मचारीवृंद यांनी ओंकारचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कर्जत : सिद्धार्थ बोर्डिंग कर्जत (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) या अनुदानित वसतिगृहात राहणारा व रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, कर्जत येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आजबे ओंकार सोमीनाथ याने संविधान दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर, समाज कल्याण विभाग व दिव्यांग कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल जाहीर झाला आहे.
या यशाबद्दल जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, लेखाधिकारी राघवेंद्र चव्हाण, चित्रांग सुरेश सोनार, अनुदानित वसतिगृह संस्थाचालक महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब भोईटे, सिद्धार्थ बोर्डिंगचे अध्यक्ष डॉ. नितीन साळवे तसेच सर्व पदाधिकारी व कर्मचारीवृंद यांनी ओंकारचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS