Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. असीम सरोदे यांना वात्सल्य पुरस्कार जाहीर

ईश्‍वरपूर /प्रतिनिधी : सावित्री महिला मंडळ, कामेरी (ता. वाळवा) यांचे वतीने ’शब्द गुणिले विचार बरोबर समृध्द समाज जीवन’ ह्या विचाराने समाज प्रबोधनाचा व

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, मुलाचा फैसला उद्या
सातारा जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविणार : पालकमंत्री

ईश्‍वरपूर /प्रतिनिधी : सावित्री महिला मंडळ, कामेरी (ता. वाळवा) यांचे वतीने ’शब्द गुणिले विचार बरोबर समृध्द समाज जीवन’ ह्या विचाराने समाज प्रबोधनाचा वसा घेवून शुक्रवार, दि. 16 जानेवारी पासून सुरू होणार्‍या 24 व्या वात्सल्य भगिनी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव यांच्याहस्ते होणार आहे. विचारांचा अनमोल खजिना लुटण्यासाठी आपल्या मैत्रिणी व कुटुंबीयांसह सर्व ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिर कामेरी येथे दररोज सायं 7 वा. वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थापक सचिव सौ. छाया पाटील यांनी केले आहे.
या वात्सल्य भगिनी व्याख्यानमालेतील पहिले पुष्प शुक्रवार, दि. 16 जानेवारी रोजी कथाकथनकार प्रा. उदयराज पाटील हे ग्रामीण कथाकथन या विषयावर गुंफणार आहेत. यावेळी राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. शनिवार, दि. 17 जानेवारी रोजी डॉ. स्वप्नील छाया विलास चौधरी यांचे जगण्यातल्या कविता या विषयावर व्याख्यान होणार आहे अध्यक्षस्थानी उरुण-ईश्‍वरपूरच्या नूतन नगरसेविका पुष्पलता खरात उपस्थित राहणार आहेत. रविवार, दि. 18 जानेवारी रोजी संजय श्रीधर आवटे यांचे गांधी ते नेहरु व्हाया आंबेडकरया विषयावर समारोपाची व्याख्यान होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. एकनाथ पाटील उपस्थित राहणार आहेत.
यावर्षीचा वात्सल्य पुरस्कार अ‍ॅड. असीम सरोदे प्रदान करण्यात येणार आहे.

COMMENTS