Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनाच सक्षम

प्रभाग 17 मध्ये आ. आनंदराव बोंढारकर यांचा झंझावाती प्रचारनांदेड । प्रतिनिधीनांदेड दक्षिण भागातील प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिव

दीर्घ मुदतीनंतरच्या निवडणूकांची प्रचार धुमाळी !
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
स्मार्ट सिटीचे स्लाईड्स आणि वास्तवाचे खड्डे : नांदेडला गाजर नव्हे, जमिनीवरचा विकास हवा!

प्रभाग 17 मध्ये आ. आनंदराव बोंढारकर यांचा झंझावाती प्रचार
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड दक्षिण भागातील प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून, नागरी मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणे आवश्यक आहे, असे ठाम मत आ. आनंदराव बोंढारकर यांनी व्यक्त केले. यासाठी प्रत्येक प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. बोंढारकर यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी प्रभागातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारादरम्यान त्यांनी स्थानिक प्रश्न जाणून घेत नागरिकांना विकासाबाबत विश्वास दिला. यावेळी बोलताना आ. आनंदराव बोंढारकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वसामान्य जनतेसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजना, महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत तसेच सर्वसामान्यांच्या मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याचे निर्णय हे त्याचे ठळक उदाहरण आहेत. या योजनांचा थेट लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची सत्ता असल्यामुळे त्या भागाचा लक्षणीय विकास झाला असून, आता नांदेड दक्षिण भागाचा कायापालट करण्याची जबाबदारी जनतेने आपल्यावर सोपवली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा विकास अधिक गतीने साधायचा असेल तर महानगरपालिकेतही शिवसेनेची सत्ता आवश्यक आहे, असे ते म्हणाले. महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नांदेड दक्षिणमधील प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, अशी ग्वाही देताना या विकासाची जबाबदारी आ. हेमंत पाटील यांनी स्वीकारली असल्याचेही आ. बोंढारकर यांनी नमूद केले. त्यामुळे प्रभाग 17 सहित नांदेड दक्षिणमधील सर्व शिवसेना उमेदवारांना भरघोस मनतांनी विजयी करून पुन्हा एकदा शिवसेनेवर विश्वास दाखवावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

COMMENTS