लाभक्षेत्र दुष्काळमुक्त होणार; जलसंपदा मंत्री विखे पाटील अहिल्यानगर : येत्या पंधरा दिवसांत साकळाई पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करून लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळमुक्त करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील सारोळे कासारा येथे सुमारे तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, साकळाई योजनेचे काम पूर्ण करून स्व. शिवाजीराव कर्डीले यांचे स्वप्न पूर्ण केले जाईल. या भागातील नागरिकांनी वर्षानुवर्षे पाण्यासाठी प्रतीक्षा केली. महायुती सरकारने साकळाई योजनेच्या सर्व कामांना मंजुरी दिली असून पुढील पंधरा दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे सारोळे कासारा परिसरातील २९५ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून १३ बंधाऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत ग्राम योजना’ अंतर्गत प्रत्येक गावाला तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून ग्रामपंचायतीमार्फत विकास नियोजन करताना १२५ दिवसांच्या रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या एकही योजना बंद करण्यात आलेल्या नसून कोविडनंतर सुरू झालेल्या मोफत धान्य योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या गुंतवणुकीचा लाभ जिल्ह्याला कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. संरक्षण उत्पादनाचे केंद्र म्हणून जिल्हा नावारूपाला येत असून दळणवळणाच्या सुविधा वाढत आहेत. छत्रपती संभाजीनगर–पुणे ग्रीनफिल्ड मार्गामुळे जिल्हा मोठ्या औद्योगिक नगरांशी जोडला जाणार असल्याने युवकांच्या भवितव्यासाठी औद्योगिक विकास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उद्योजक दिलीप दाते, सरपंच आरती कडूस, रविंद्र कडूस, योगिता निंभोरे, सरपंच किरण साळवे, संतोष खोबरे, दादाभाऊ चितळकर, रंगनाथ निमसे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुकडी कालव्याच्या कामांसाठी ४०० कोटी कुकडी कालव्याच्या कामांसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कालव्याची कामे मार्गी लागल्यानंतर आवर्तनाचा चाळीस दिवसांचा कालावधी कमी होईल. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठ्याचा विचार जलसंपदा विभाग करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

लाभक्षेत्र दुष्काळमुक्त होणार; जलसंपदा मंत्री विखे पाटील
अहिल्यानगर : येत्या पंधरा दिवसांत साकळाई पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करून लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळमुक्त करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील सारोळे कासारा येथे सुमारे तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत पार पडले, त्या वेळी ते बोलत होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, साकळाई योजनेचे काम पूर्ण करून स्व. शिवाजीराव कर्डीले यांचे स्वप्न पूर्ण केले जाईल. या भागातील नागरिकांनी वर्षानुवर्षे पाण्यासाठी प्रतीक्षा केली. महायुती सरकारने साकळाई योजनेच्या सर्व कामांना मंजुरी दिली असून पुढील पंधरा दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे सारोळे कासारा परिसरातील २९५ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून १३ बंधाऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत ग्राम योजना’ अंतर्गत प्रत्येक गावाला तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून ग्रामपंचायतीमार्फत विकास नियोजन करताना १२५ दिवसांच्या रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या एकही योजना बंद करण्यात आलेल्या नसून कोविडनंतर सुरू झालेल्या मोफत धान्य योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या गुंतवणुकीचा लाभ जिल्ह्याला कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. संरक्षण उत्पादनाचे केंद्र म्हणून जिल्हा नावारूपाला येत असून दळणवळणाच्या सुविधा वाढत आहेत. छत्रपती संभाजीनगर–पुणे ग्रीनफिल्ड मार्गामुळे जिल्हा मोठ्या औद्योगिक नगरांशी जोडला जाणार असल्याने युवकांच्या भवितव्यासाठी औद्योगिक विकास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उद्योजक दिलीप दाते, सरपंच आरती कडूस, रविंद्र कडूस, योगिता निंभोरे, सरपंच किरण साळवे, संतोष खोबरे, दादाभाऊ चितळकर, रंगनाथ निमसे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुकडी कालव्याच्या कामांसाठी ४०० कोटी
कुकडी कालव्याच्या कामांसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कालव्याची कामे मार्गी लागल्यानंतर आवर्तनाचा चाळीस दिवसांचा कालावधी कमी होईल. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठ्याचा विचार जलसंपदा विभाग करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS