कोपरगाव : कोपरगाव बाजार समितीमध्ये शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ८० लाख र

कोपरगाव : कोपरगाव बाजार समितीमध्ये शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ८० लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत अशी माहिती कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम व उपसभापती गोवर्धन परजणे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन हमीभावाने खरेदी करणेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड कोपरगाव या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.
या खरेदी केंद्रावर ५ हजार ३२८ रुपये हमीभावाने तालुक्यातील शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी केली जाते. दिनांक १० जानेवारी २०२६ अखेर दोन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. शेतक-यांनी ३१ जानेवारी २०२६ अखेर नाव नोंदणी करावी. बाजार समितीने शेतक-यांची सोयाबीन खरेदी करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध़ करुन दिल्या आहेत. तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी आपली सोयाबीन हमीभाव रुपये ५३२८/- प्रति क्विंटल प्रमाणे बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर विक्रीस आणावी तसेच शेतक-यांनी वेळेत नोंदणी करुन या शासकिय योजनेचा लाभ घ्यावा व आपली आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

COMMENTS