Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यातील क्रीडा संकुल महत्वपूर्ण ठरेल : पालकमंत्री विखे 

श्रीगोंदा : ग्रामीण भागातील युवकांमध्ये खूप गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी, सुविधा व व्यासपीठ मिळाले तर ते राज्य व देश पातळीवर चमकदार कामगिरी करू शकतात. अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राची परंपरा सर्व खेळाडूंनी आपल्या नैपुण्यातून जोपासली आहे. श्रीगोंदा येथे उभारण्यात येणारे हे क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. श्रीगोंदा शहरातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या सर्व सुविधांयुक्त  क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, तहसीलदार सचिन डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, मुख्याधिकारी पुष्पागंधा भगत, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे आदी उपस्थित होते.     सुमारे साडे आठ कोटी रुपयांच्या माध्यमातून पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या धर्तीवर २ हेक्टर जागेवर क्रीडा विकासाची कामे या ठिकाणी करण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलामध्ये मैदाने, धावपट्टी, इनडोअर क्रीडा हॉल, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, प्रेक्षक गॅलरी, बदलगृहे, प्रकाशव्यवस्था आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी श्रीगोंदा येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय विश्रामगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली.

विज्ञान प्रदर्शनाचे अनुदान वाढल्याने संशोधन वृत्तीला बळ
संत ज्ञानेश्‍वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा त्वरित सादर करा
वाळू माफियाप्रमाणे लँडमाफियांना महसूलमंत्री लगाम घालणार का ?

श्रीगोंदा : ग्रामीण भागातील युवकांमध्ये खूप गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी, सुविधा व व्यासपीठ मिळाले तर ते राज्य व देश पातळीवर चमकदार कामगिरी करू शकतात. अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राची परंपरा सर्व खेळाडूंनी आपल्या नैपुण्यातून जोपासली आहे. श्रीगोंदा येथे उभारण्यात येणारे हे क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

श्रीगोंदा शहरातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या सर्व सुविधांयुक्त  क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, तहसीलदार सचिन डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, मुख्याधिकारी पुष्पागंधा भगत, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे आदी उपस्थित होते.

    सुमारे साडे आठ कोटी रुपयांच्या माध्यमातून पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या धर्तीवर २ हेक्टर जागेवर क्रीडा विकासाची कामे या ठिकाणी करण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलामध्ये मैदाने, धावपट्टी, इनडोअर क्रीडा हॉल, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, प्रेक्षक गॅलरी, बदलगृहे, प्रकाशव्यवस्था आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी श्रीगोंदा येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय विश्रामगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली.

COMMENTS