Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत काँगे्रसचा स्वबळाचा निर्णय ठरणार आत्मघातकी

अनेक प्रभागात काँगे्रसचे उमेदवार नसल्याने प्रश्‍नचिन्हमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने घेतलेला ‘स्वबळाचा’ निर

जुहूमधील 35 हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
मुंबई महापालिका निवडणूक: जागावाटपावरून रामदास आठवलेंची मोठी घोषणा; महायुतीला घरचा आहेर!
मुंबई महानगरपालिकेत येणार महायुतीची सत्ता ; एक्झिट पोलचा अंदाज

अनेक प्रभागात काँगे्रसचे उमेदवार नसल्याने प्रश्‍नचिन्ह
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने घेतलेला ‘स्वबळाचा’ निर्णय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात युती झाल्यानंतर काँग्रेसलाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका कायम ठेवली. या निर्णयाचे परिणाम प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे.
स्वबळाचा निर्णय घेऊनही काँग्रेस व मित्रपक्ष वंचित बहुजन आघाडी मिळून अनेक प्रभागांत उमेदवार उभे करण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. उपलब्ध माहितीनुसार सुमारे 36 जागांवर उमेदवारी निश्‍चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे या रणनीतीमधून नेमके काय साध्य झाले, असा प्रश्‍न राजकीय निरीक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवसेना (ठाकरे गट)ने प्रथम मनसेसोबत हातमिळवणी करत विरोधी आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काँग्रेसलाही सोबत घेण्याचे प्रयत्न झाले. मात्र वैचारिक मुद्दे आणि स्थानिक राजकारणाचा विचार करत काँग्रेसने स्वतंत्र मार्ग स्वीकारला. मात्र प्रत्यक्ष मैदानात काही प्रभागांत काँग्रेसचे संघटन असूनही उमेदवार न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये काँग्रेसचा एकही अधिकृत उमेदवार नसल्याचे दिसून येते. प्रभाग क्रमांक 6, 11, 12, 13, 14, 15, 19, 21, 30, 46, 80, 84, 117, 153, 182 आणि 198 या प्रभागांचा त्यात समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षांतर्गत समन्वय आणि नियोजनाबाबत चर्चा रंगत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीही व्यक्त होत आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत 62 जागा सोडल्या होत्या. मात्र त्यापैकी 16 जागांवर वंचितकडून उमेदवार दिले जाऊ शकलेले नाहीत. विशेष म्हणजे काही प्रभागांत दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे या युतीतील ताळमेळाबाबत प्रश्‍न उपस्थित होत असून, याचा फायदा प्रतिस्पर्धी आघाड्यांना होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

COMMENTS