Homeदखल

डॉ. संग्राम पाटील यांची चौकशी निषेधार्ह!

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि महाराष्ट्राचे अभिमानी सुपुत्र डॉ. संग्राम पाटील यांना मोदी सरकारविरुद्ध "आक्षेपार्ह" सोशल मीडिया संभाषणात सहभागी

दहावीच्या परीक्षेचा सरकारचा अभ्यास कच्चा
सत्तेपेक्षा वेळ साधणाऱ्या शरद पवारांना शह म्हणजे शक्ती !
महाराष्ट्राची ‘रूलिंग कास्ट’ आरक्षण याचक कशी बनली ? 

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि महाराष्ट्राचे अभिमानी सुपुत्र डॉ. संग्राम पाटील यांना मोदी सरकारविरुद्ध “आक्षेपार्ह” सोशल मीडिया संभाषणात सहभागी झाल्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने काल पहाटेच मुंबईच्या अदानी विमानतळावर त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे २ वाजल्यापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्तानं ताब्यात ठेवलेलं. खरं तर हे अन्याकारक आणि छळवादी आहे. या संदर्भात ब्रिटिश कायदेशीर अधिकाऱ्यांना काही कळवण्यात आले होते की नाही, हे निश्चित होऊ शकले नाही. वैद्यकीय डॉक्टर, लेखक, कार्यकर्ते असलेले डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन ताब्यात घेतलं. कोविड काळात या महामारीशी लढण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून ते सातत्यानं वैद्यकीय मार्गदर्शन करत असत त्यामुळं ते चर्चेत आले होते. मानवाधिकार कार्यकर्ते  ऍड. असिम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली होती. मोदी सरकारवर सातत्यानं टीकात्मक भूमिका घेत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे. डॉ. संग्राम पाटील २०२० च्या कोरोना काळापासून लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि योग्य वैद्यकीय सल्ला देण्याकरिता, त्याचबरोबर कोरोनाच्या संदर्भात लोकांना घाबरवणारे जे संदेश वायरल होत, त्या विरोधात त्यांनी वैद्यकीय लोक जागृती करत, कोरोना काळातील भीती ज्यांना होती, त्या सगळ्यांना तर दिलासा दिलाच; पण, कोरोनातून बाहेर येण्याची मानसिकता आणि आत्मविश्वास ही त्यांनी प्रदान केला.  संग्राम पाटील यांनी विशेषतः कोविड-१९ च्या काळात अत्यंत सोप्या भाषेत विज्ञानाचा प्रसार केला. जेव्हा देश अफवांच्या विळख्यात होता, तेव्हा त्यांनी लंडनमध्ये राहूनही भारतीयांना अचूक वैद्यकीय माहिती दिली. पण जेव्हा एखादा डॉक्टर विज्ञानासोबतच सामाजिक आणि राजकीय आरोग्याबद्दल बोलू लागतो, तेव्हा व्यवस्थेला त्याची भीती का वाटावी? केवळ सोशल मीडियावरील मतांमुळे एखाद्याची बरेच तास चौकशी होणे, ही सुदृढ लोकशाहीची लक्षणे नाहीत. परंतु, याच काळामध्ये कोरोना काळात चांगली कामगिरी बजावणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहण्यात आलं आणि उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री असताना त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्रामध्ये कोविड नियंत्रणाची भूमिका ही बजावली होती. भारतात विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारवर टीका करणाऱ्यांविरुद्ध होणारी कारवाई आता नवीन राहिलेली नाही. मात्र, नुकतीच लंडनहून मुंबईत परतलेले प्रसिद्ध डॉक्टर आणि अभ्यासक डॉ. संग्राम पाटील यांची विमानतळावर झालेली चौकशी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आणि चिंतेत टाकणारी घटना आहे. लोकशाहीत सरकारवर टीका करणे हा नागरिकांचा घटनादत्त अधिकार आहे. जर डॉ. पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर किंवा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असेल, तर त्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी त्यांना बेड्या ठोकण्यासाठी चौकशी करणे हे ‘सत्तेचा गैरवापर’ दर्शवते. आक्षेपार्ह पोस्टचा आधार घेऊन थेट विमानतळावरून ताब्यात घेण्याची पद्धत ही गुन्हेगारांपेक्षा विचारवंतांना घाबरवण्यासाठी वापरली जात असल्याचे स्पष्ट दिसते. डॉ. पाटील हे परदेशात स्थायिक असलेले एक यशस्वी भारतीय आहेत. अशा प्रकारे उच्चशिक्षित व्यक्तींना केवळ मतांतरामुळे त्यांना अटक करण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र त्यांचे नागरिकत्व यू के चे असल्याने त्यांना अटक करता आली नाही. मात्र अशा प्रकारामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन होत आहे. “तुम्ही आमच्या विरोधात बोलाल तर भारतात सुरक्षित राहू शकणार नाही,” असा एक प्रकारचा धाक या कारवाईतून निर्माण केला जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. डॉ. संग्राम पाटील यांची चौकशी ही केवळ एका व्यक्तीची  नसून ती मुक्त विचारांच्या प्रवाहावर घातलेली बंदी आहे. कोणत्याही लोकशाहीत विरोधाचा आवाज हा सरकारला अधिक सतर्क आणि पारदर्शक बनवण्यासाठी आवश्यक असतो. तो आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत व्हायला वेळ लागत नाही.

COMMENTS