कर्जत : तालुक्यातील शिंदे गावामध्ये हनुमंत गोरख घालमे (वय ३५) याचा अज्ञात व्यक्तीने खून केला आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर

कर्जत : तालुक्यातील शिंदे गावामध्ये हनुमंत गोरख घालमे (वय ३५) याचा अज्ञात व्यक्तीने खून केला आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बापू झुंबर घालमे (रा.शिंदा, ता.कर्जत) यांनी कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की,
सहा जानेवारीस सकाळी पोलीस पाटील आप्पा घालमे यांचा फोन आला व त्यांनी तुझा चुलता हनुमंत घालमे यास कोणीतरी मारहाण केल्याचे समजले आहे तर नेमके काय प्रकार आहे हे त्यांच्या घरी जाऊन पहा असे सांगितले. त्यानंतर मी चुलते गोरख घालमे यांच्या घरी जाऊन पाहिले असता तेथे त्याच वस्तीवर राहणाऱ्या सोजर बाई घालमे, जालिंदर घालमे, अशोक घालमे, बबन घालमे असे व इतर लोक जमलेले दिसले त्यावेळी चुलत भाऊ हनुमंत गोरख घालमे हा त्याच्या घरात रक्ताच्या थारोळात पडलेला दिसला. यावेळी सोजर बाई घालमे यांनी सांगितले की, चुलते जालिंदर बापू घालमे हे सकाळी साडेसहाच्या सुमारास ते हनुमंत यांच्या घरी गेट उघडून गेले. हनुमंत हा त्याच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मयत होऊन पडल्याची दिसले. त्यानंतर याबाबत गावातील पोलीस पाटील यांना कळवण्यात आले.
दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण लोखंडे व पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यांनी भेट दिली. याशिवाय त्या ठिकाणी डॉग स्कॉड आणण्यात आले होते. फिंगरप्रिंटचे ठसे घेण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास आता करत आहे.

COMMENTS