Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे :  माजी मंत्री थोरात 

संगमनेर : भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना असून या राज्यघटनेने देशाला समृद्ध अशी लोकशाही दिली आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारिता क्षेत्

जिल्हा बँक मातृसंस्था म्हणून जिल्ह्याच्या विकासात पाठीशी : माजी मंत्री थोरात
बोगस बियाणेप्रकरणी कंपन्यांवर कारवाई का नाही ?
Sangamner : संगमनेर शहरातील चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार (Video)

संगमनेर : भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना असून या राज्यघटनेने देशाला समृद्ध अशी लोकशाही दिली आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारिता क्षेत्राचे मोठे योगदान असून ही लोकशाही अधिक समृद्ध करण्यासाठी सर्व पत्रकारांनी योगदान द्यावे असा आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

 यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांना शुभेच्छा देताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन मराठी पत्रकार दिन म्हणून मोठ्या आनंदाने आपण साजरा करतो. पत्रकारितेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चांगल्या कामांच्या पाठीशी उभे राहण्याबरोबर चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी पत्रकारितेने काम केले आहे. या क्षेत्राला मोठा इतिहास असून सध्या मात्र काही माध्यमे हे विशिष्ट राजकीय अजेंडा वापरत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. पत्रकारांनी निरपेक्षपणे काम करताना लोकशाही अधिक समृद्ध केली पाहिजे. याचबरोबर नागरिकांना मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देत चांगल्या कामांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. अहिल्यानगर जिल्हा आणि संगमनेर मधील पत्रकारांनी सातत्याने चांगल्या कामांची दखल घेतली असल्याचे सांगून सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकार दिनाच्या निमित्ताने, आ.सत्यजित तांबे, माजी आ.डॉ.सुधीर तांबे, दुर्गा तांबे व नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनीही सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS