Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरजूंना मदतीचा हात देणे ही नैतिक जबाबदारी : आठरे

अहिल्यानगर : अपघातांमध्ये हात गमावलेल्या व्यक्तींना बॅटरीवर चालणारा यांत्रिकी कृत्रिम हात बसविल्यामुळे त्या व्यक्तींमध्ये जीवन जगण्याची नवी उमेद न

१०० सायकलस्वार करणार पाच राज्ये व बांगलादेशातून ३००० किलोमीटरचा प्रवास
परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे ‘सर्वोच्च’ निर्देश | DAINIK LOKMNTHAN
कार्यकर्त्यांना जीव लावणारे नेतृत्व हरपले : आ. काळे

अहिल्यानगर : अपघातांमध्ये हात गमावलेल्या व्यक्तींना बॅटरीवर चालणारा यांत्रिकी कृत्रिम हात बसविल्यामुळे त्या व्यक्तींमध्ये जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे, त्यामुळे समाजातील अशा गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची नैतिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या अध्यक्ष अनुराधा विश्वासराव आठरे यांनी केले.

 इनाली फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी, रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाऊन व राष्ट्रीय सेवा योजना, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित ‘बॅटरीवर चालणारा यांत्रिकी कृत्रिम हात मोफत वितरण शिबिराच्या’ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. 

न्यू आर्ट्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाबरोबरच महाविद्यालयातील विविध विभागांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांमध्ये जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन सतत केले जाते. महाविद्यालयामध्ये दृष्टी आव्हानीत दिव्यांग केंद्राची स्थापना करण्यात आलेली असून या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागातील ४२ दिव्यांग विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत.

महाविद्यालय व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था शिक्षणाच्या माध्यमातून सतत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले. संस्थेचे सचिव ऍड. विश्वासराव आठरे पाटील यांनी सदर शिबिरास सदिच्छा भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाऊनचे माजी अध्यक्ष शब्बीर जामनगरवाला, सदस्य गौतम इदनानी, इनाली फाउंडेशनच्या  टेक्निकल टीमचे शिवा माने, अभिषेक खिंगरे, जमीर पठाण, सिद्धार्थ साकरे उपस्थित होते.

COMMENTS