Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दलित समाजाला दफनभूमीसाठी जागा देण्याची मागणी 

दहिगाव ने ग्रामपंचायतीकडे नागरिकांचे निवेदन शेवगाव  : तालुक्यातील दहिगाव ने येथील दलित समाजाला दफनभूमीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन शुक्रवारी (दि. २)  देण्यात आले असून, यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  निवेदन सादर करण्यासाठी भीमशक्ती युवा ग्रुपचे अध्यक्ष अविनाश कांबळे, उपाध्यक्ष संदेश कसबे तसेच ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचारी सचिन काळे यांनी निवेदन स्वीकारले.  या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विकास कसबे मेजर किशोर कसबे प्रशांत कसबे अजय कांबळे, सुंदर कसबे नेहाल कांबळे सचिन कांबळे, लखन नाडे, प्रशांत कसबे,  बबलू कसबे, चिकू चांदेकर यांच्यासह भीमशक्ती युवा ग्रुपचे पदाधिकारी व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.  दलित समाजाला दफनभूमीसाठी आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. ग्रामपंचायतीने या विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

स्व. थोरातांना अभिवादन करून स्वीकारला पदभार
जादूटोण्याच्या सावटाखाली मध्यरात्रीचा थरार!; देवळाली प्रवरात जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर पूजा; जीव घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप
अहिल्यानगर मंडळामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजाचे समायोजन ;  ७ लाख  वीजग्राहकांना ८ कोटी ८३ लाख रुपये परतावा

दहिगाव ने ग्रामपंचायतीकडे नागरिकांचे निवेदन

शेवगाव  : तालुक्यातील दहिगाव ने येथील दलित समाजाला दफनभूमीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन शुक्रवारी (दि. २)  देण्यात आले असून, यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 निवेदन सादर करण्यासाठी भीमशक्ती युवा ग्रुपचे अध्यक्ष अविनाश कांबळे, उपाध्यक्ष संदेश कसबे तसेच ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचारी सचिन काळे यांनी निवेदन स्वीकारले.

 या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विकास कसबे मेजर किशोर कसबे प्रशांत कसबे अजय कांबळे, सुंदर कसबे नेहाल कांबळे सचिन कांबळे, लखन नाडे, प्रशांत कसबे,  बबलू कसबे, चिकू चांदेकर यांच्यासह भीमशक्ती युवा ग्रुपचे पदाधिकारी व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

 दलित समाजाला दफनभूमीसाठी आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. ग्रामपंचायतीने या विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

COMMENTS