Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माऊली विद्यालय जवळबन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

केज । प्रतिनिधीश्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, आडस संचलित माऊली विद्यालय, जवळबन येथे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका व थोर समा

क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे कार्य आजही प्रेरणादायी : पोटे
भागुजीराव ढेकळे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरा
महात्मा गांधी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

केज । प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, आडस संचलित माऊली विद्यालय, जवळबन येथे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका व थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणार्‍या सावित्रीबाईंच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सावित्रीबाई नसत्या तर आज स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडली गेली नसती, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची माहिती देत स्त्री शिक्षणातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रमुख उपस्थिती : हजारे शिवाजी (अप्पा) भिवाजी, सोळंके एस. डी., देशमुख आर. आर., निकम ए. एम., पवार एल. एफ. यांच्यासह इतर सर्व कर्मचार्‍यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. अत्यंत प्रेरणादायी व शैक्षणिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्त्री-पुरुष समानता व शिक्षणाचे महत्त्व याबाबत नवा उत्साह निर्माण झाला.

COMMENTS