Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या द्वितीय कन्या सौ. प्रगतीताई पाटील यांचे निधन

वाळवा / प्रतिनिधी : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या द्वितीय कन्या, विश्‍वास कारखान्याचे माजी चिफ इंजिनिअर, पद्मभूषण क्रांति

शामगाव येथे लोकसहभागातून महिला कुस्ती संकुल
पहिल्या पावसातच फलटण बस स्थानक बनले पाण्याचे तळे
पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी सौ. मंगल कांबळे बिनविरोध

वाळवा / प्रतिनिधी : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या द्वितीय कन्या, विश्‍वास कारखान्याचे माजी चिफ इंजिनिअर, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकार साखर कारखान्याचे तांत्रिक सल्लागार उमाजी पाटील यांच्या पत्नी सौ. प्रगती उमाजी पाटील यांचे रविवार, दि. 4 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या राष्ट्रीय खो-खो खेळाडू होत्या. त्यांचे शिक्षण एम. ए. होते. त्या विद्यार्थी दशेपासून पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या सर्व चळवळीत अग्रभागी असत. सौ. प्रगतीताई ह्या विश्‍वास सहकारी पतसंस्थेत संचालक म्हणून होत्या. त्यांच्या पश्‍चात उच्च शिक्षित मुलगा व सुन आहेत. सौ. प्रगतीताईंच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान भारती हॉस्पीटल, सांगली येथे करण्यात येणार आहे. आपल्या देहाचे देहदान करुन वैद्यकिय शिक्षणासाठी मौलाचे योगदान देऊन क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या विचाराचा वारसा खर्‍या अर्थाने जपला आहे. सोमवार, दि. 5 जानेवारी 2026 रोजी दु. 1.00 ते 2.00 पर्यंत भारती हॉस्पीटल सांगली येथे त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवणेत येणार आहे. त्यांच्या निधनाने हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाने व कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांनी दुखवटा जाहिर केला. वाळवा व शिराळा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना सौ. प्रगतीताई यांचे निधनाने दु:ख अनावर झाले आहे. सांगली येथे भारती हॉस्पीटल येथे सौ. प्रगतीताई यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने जात आहेत.

COMMENTS