Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभाग सहामध्ये शीला भवरे यांच्या निष्क्रियतेचा मुद्दा चांगलाच गाजतोय

प्रवेशिका जाधव व लक्ष्मीबाई जमदाडे यांनी त्यांच्यापुढे उभे केले आव्हान नांदेड । प्रतिनिधी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा

दीर्घ मुदतीनंतरच्या निवडणूकांची प्रचार धुमाळी !
मुंबईत सत्ता कोण राखणार ?
नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार : बावनकुळे

प्रवेशिका जाधव व लक्ष्मीबाई जमदाडे यांनी त्यांच्यापुढे उभे केले आव्हान
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा हा यंदा सर्वाधिक चर्चेचा आणि लक्षवेधी प्रभाग ठरत असून येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे  उमेदवार प्रवेशिका क्षितिज जाधव आणि विरोधी गटातील अनुभवी चेहरा माजी महापौर शीला भवरे, शिवसेनेच्या लक्ष्मीबाई दिगंबर जमदाडे यांच्यात  प्रतिष्ठेची लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या प्रभागामध्ये उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केल्याने प्रभाग सहामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शीला भवरे यांनी या प्रभागाचे नेतृत्व केलेले असले तरी या प्रभागातील नागरिकांशी त्यांचा संवाद नाही. या प्रभागात त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कधीही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे अनेक नागरिकांना त्यांचे नाव सुद्धा ठाऊक नाही. ते किंवा त्यांचे पती किशोर भवरे यांनी नागरिकांच्या समस्यांना कधी प्राधान्य दिले नाही. निवडून आल्यानंतर थेट आठ वर्षानंतर या प्रभागाची त्यांना आठवण झाली आहे. अनेक प्रभागातील नागरिक किशोर भवरे दिसल्यानंतर तुम्ही आठ वर्षानंतर या प्रभागात पहिल्यांदाच दिसत असल्याबद्दल टोकत आहेत. त्यांच्या निष्क्रियतेचा फटका प्रभाग क्रमांक सहा मधील भाजपाच्या इतर उमेदवारांना चांगलाच बसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रवेशिका क्षितिज जाधव हृया सुशिक्षित, तरुण आणि संघटनात्मक कामातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणूक लढवत असून तरुणाई, विकास आणि सामाजिक समरसता हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे. प्रभागातील नागरी समस्या, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, आरोग्य व स्वच्छता या प्रश्नांवर त्यांनी थेट संवाद साधत प्रचाराला गती दिली आहे. विशेषतः युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रवेशिका क्षितिज जाधव यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच शिवसेनेच्या लक्ष्मीबाई दिगांबर जमदाडे या माधव जमदाडे यांच्या मातोश्री असून या प्रभागामध्ये माधव जमदाडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सर्वसामान्यांच्या सुखदुःखाला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे लक्ष्मीबाई जमदाडे यांनाही मतदारांची पसंती मोठ्या प्रमाणावर मिळणार असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे शीला भवरे यांना नगरसेवक पदाचा अनुभव असला तरी मागील कार्यकाळात नागरी प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, अपूर्ण विकासकामे आणि जनसंपर्काचा अभाव यावरून नागरिकांमध्ये नाराजीचा सूरही ऐकू येत आहे. त्यामुळे भवरे यांच्यासमोर केवळ निवडणूक जिंकण्याचेच नव्हे तर अकार्यक्षमतेमुळे गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रभाग सहा हा सामाजिकदृष्ट्या विविध घटकांचा प्रभाग असून येथे मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता कमी आणि प्रत्यक्ष कामगिरीवर आधारित मतदान होण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे जुना अनुभव विरुद्ध नवे नेतृत्व अशी ही लढत आकार घेत असून क्षितिज जाधव यांनी दिलेल्या आक्रमक प्रचार आणि संघटित रणनीतीमुळे भवरे यांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे भाजपच्या इतर उमेदवारांची मोठी गोची निर्माण झाली आहे. एकूणच, प्रभाग सहा मध्ये क्षितिज जाधव विरुद्ध भवरे ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील नसून बदलाची अपेक्षा करणार्‍या मतदारांची कसोटी ठरणार आहे. येत्या काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होणार असून या थेट लढतीकडे संपूर्ण नांदेडचे लक्ष लागले आहे. या प्रभागामध्ये क्रॉस वोटिंगचा मोठा फटका बसणार आहे. अनेक नागरिकांनी यापूर्वी आम्ही शीला भवरे यांना या प्रभागाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आता आम्ही प्रवेशिका क्षितीज जाधव व लक्ष्मीबाई जमदाडे यांना संधी देऊन पाहू असे सांगितले. त्यामुळे जो उमेदवार मतदारांना सक्षम व नागरी समस्या सोडवण्यासाठी तत्पर वाटेल त्याच्या पाठीमागे या प्रभागातील जनता मोठ्या प्रमाणावर राहू शकते असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

COMMENTS