Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

पुणे : राज्यात प्रतिबंधित असलेल्या पदार्थांच्या उत्पादन व विक्रीविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्यानंत

एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने वार ;  गंभीर जखमी; जखेडमधील घटना
बंगळुरू विमानतळावर परदेशी महिलेचा विनयभंग
श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदारवर गोळीबार

पुणे : राज्यात प्रतिबंधित असलेल्या पदार्थांच्या उत्पादन व विक्रीविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने कारवाईचा वेग वाढवला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथे सुरू असलेल्या एका खासगी कंपनीवर छापा टाकून तब्बल 32 कोटी रुपयांच्या आसपासचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे.
एफडीएने ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. लि.’ या कंपनीवर ही कारवाई केली. तपासादरम्यान विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का उत्पादने, कच्चा माल तसेच फ्लेवर्सचा मोठा साठा आढळून आला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 31 कोटी 67 लाख 21 हजार 987 रुपये असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कारवाईनंतर कंपनीच्या परिसराला सील ठोकण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 1 डिसेंबर 2025 रोजी कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्‍लेषकांच्या अहवालात या नमुन्यांमध्ये निकोटीन आढळून आले. हे घटक मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे असून, 16 जुलै 2025 रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे हे सरळ उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब लक्षात येताच 2 जानेवारी 2026 रोजी एफडीएने थेट छापा टाकून कारवाई केली.

COMMENTS