Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनसामान्यांच्या समस्यांना ‘काकाजी’ मुंदडांचा पाठिंबा

हनुमान मळ्यातील 25 वर्षांचा अंधार झाला दूरकेज । प्रतिनिधीअंबाजोगाई-जोगाईवाडी सीमेवरील हनुमान मळा परिसरातील रहिवासी गेल्या 25 वर्षांपासून अनेक मूलभ

अंबाजोगाईकरांना मोठा दिलासा: नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडांकडून पाणीपुरवठा सुधारणा
अंबाजोगाईत कंत्राटी कामगारांचा वेतनवाटप
अंबाजोगाईकरांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट!

हनुमान मळ्यातील 25 वर्षांचा अंधार झाला दूर
केज । प्रतिनिधी
अंबाजोगाई-जोगाईवाडी सीमेवरील हनुमान मळा परिसरातील रहिवासी गेल्या 25 वर्षांपासून अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित होते. रस्ते, नाले, वीज आणि पथदिवे यांसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या काळात अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नागरिक नंदकिशोर (काकाजी) मुंदडा आणि आमदार नमिता ताई मुंदडांच्या विशेष प्रयत्नांमुळे या समस्यांवर अखेर यशस्वी तोडगा लागला आहे.
स्थानिक रहिवासी श्री. धाट सर यांनी काकाजी मुंदडांकडे दोन प्रमुख समस्या मांडल्या होत्या: 1. रंगागुल्ली हॉटेल ते हनुमान मळा या रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे रात्री अंधार, प्रवाशांसह रहिवाशांसाठी धोका निर्माण होत होता. 2. महावितरणचा (चडएइ) एक विद्युत पोल एका घराच्या कंपाऊंडमध्ये झुकलेला होता. त्यामुळे जिवंत विद्युत तारे हाताला लागण्याच्या धोक्यात होत्या. काकाजी मुंदडांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली आणि महावितरण तसेच नगर परिषद प्रशासनाला सूचित केले. प्रशासनाने त्यानुसार खालील उपाययोजना त्वरित केली: धोकादायक पोल काढून त्याऐवजी नवीन, मजबूत पोल बसवण्यात आला. रस्त्यावर आवश्यक ठिकाणी नवीन पथदिवे बसवून अंधार दूर केला गेला. या कामात महावितरणचे इंजिनिअर कराड साहेब, न.प. कर्मचारी अतुल जोगदंड, कंत्राटदार आणि कर्मचारी तसेच श्री. किशोर फड यांनी मोलाचे सहकार्य केले. रहिवासी म्हणतात स्थानीय रहिवासी श्री. धाट सर म्हणाले: सार्वजनिक असो वा वैयक्तिक, सामान्यांच्या प्रश्नांसाठी काकाजी सदैव तत्पर असतात. हनुमान मळ्याचा प्रश्न ज्या वेगाने सुटला, ते पाहून प्रशासनावरील त्यांचा वकुब आणि जनतेबद्दलची तळमळ दिसून येते.
नागरिकांसाठी आवाहन
कोणत्याही सरकारी किंवा प्रशासकीय कार्यालयात आपले काम अडकले असल्यास किंवा न्याय मिळत नसेल, तर नागरिकांनी नि:संकोचपणे काकाजी मुंदडांशी संपर्क साधावा. संपर्क: श्री. नंदकिशोर (काकाजी) मुंदडा – 9422240523 (फोन व्यस्त असल्यास व्हॉट्सप संदेशाद्वारे आपली समस्या कळवावी.

COMMENTS