Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजितदादांनी बीडच्या कलावंत व रसिकांना पावले

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी 8 कोटी 19 लाखांचा निधी मंजूरबीडकरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश : डॉ. गणेश ढवळेबीड । प्रतिनिधीबीड शहराच्या सांस

अजित पवारांच्या पाठपुराव्यानंतर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचा प्रश्‍न लागला मार्गी
सुप्रियाविरूद्ध सुनेत्राला उभे करणे चूकच
पक्ष फोडला आता कंत्राटी भरतीचे पाप करू नका

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी 8 कोटी 19 लाखांचा निधी मंजूर
बीडकरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश : डॉ. गणेश ढवळे
बीड । प्रतिनिधी
बीड शहराच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 8 कोटी 19 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच हा निर्णय झाल्याने बीडमधील कलावंत, रंगकर्मी व रसिक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
एप्रिल 2025 मध्ये नाट्यगृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक मेळाव्यानंतर नाट्यगृहाची गंभीर दुरवस्था समोर आली होती. तुटलेल्या काचा, मोडलेल्या खुर्च्या, मेकअप रूममधील अपुरी विद्युत व्यवस्था तसेच स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था यामुळे नाट्यगृह वापरण्यायोग्य राहिले नव्हते. या सर्व बाबी आमदार विजय सिंह पंडित व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व संयोजक बळीराम गवते यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यावेळी अजितदादांनी नाट्यगृह दुरुस्तीसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त आयोजित जाहीर सभेत शासन आदेश दाखवत निधी मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली. या निर्णयाचे नाट्यगृह बचाव समिती, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील नाट्यकलावंतांनी स्वागत करत पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले. नाट्यगृहाच्या प्रश्नाला सातत्याने शासनदरबारी वाचा फोडणार्‍या प्रसारमाध्यमांचेही डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी विशेष आभार मानले.
राजकीय पुढार्‍यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
नाट्यगृह दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी योगेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे, तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळुक व अनिलदादा जगताप यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
नाट्यगृह बचाव समितीच्या आंदोलनाला यश
नाट्यगृह बचाव समितीचे सतीश साळुंखे व प्रतीक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि. 13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले होते. निधी न दिल्यास नाट्यगृहाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी नीत अंधारे यांनी तात्पुरत्या स्वरूपात 10 लाख रुपयांची तरतूद केली होती.
सामाजिक कार्यकर्त्यांचा ठोस आवाज
नाट्यगृहाच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 फेब्रुवारी रोजी नाट्यगृह परिसरात लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात बीडमधील अनेक नाट्यकलावंत सहभागी झाले होते.
प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या दुरवस्थेबाबत विविध दैनिके व माध्यमांनी सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळेच नाट्यगृहासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होण्यात प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केले.

COMMENTS