Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

अंबादेवी संस्थानाला चिखलदर्‍यात 3 एकर जमीन मंजूर

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यासा

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा यांचे आवाहन
स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन ः मुख्यमंत्री फडणवीस
कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे पाठबळ मिळणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महसूल विभागाशी संबंधित एकमेव निर्णयानुसार, अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानाला चिखलदरा तालुक्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) मालकीची 3 एकर 8 आर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे चिखलदर्‍यातील धार्मिक पर्यटन आणि देवस्थान विकासाला मोठी चालना मिळणार आहे. चिखलदरा येथील ही जमीन 1975 साली पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उभारण्याच्या उद्देशाने एमटीडीसीकडे वर्ग करण्यात आली होती. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून सुमारे साडे सात एकर क्षेत्रातील ही जमीन प्रत्यक्ष वापरात न आल्याने ती निष्प्रभ अवस्थेत पडून होती. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर, या जमिनीचा लोकहितासाठी योग्य आणि उपयुक्त वापर कसा करता येईल, याचा विचार सुरू झाला. त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला.
अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाकडे चिखलदरा येथील ‘देवी पॉईंट’ तसेच ‘विराट देवी’ देवस्थानाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या दोन्ही धार्मिक स्थळांचा विकास, भाविकांसाठी सुविधा विस्तार आणि आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थानाने शासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी केली होती. जागेअभावी विकासकामे रखडत असल्याने संस्थानाने केलेल्या या मागणीला मंत्रिमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पर्यटनासाठी दीर्घकाळ वापरात न आलेली जमीन आता धार्मिक विकासाच्या प्रवाहात सामील होणार असल्याने, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासह पर्यटनालाही अप्रत्यक्ष लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धार्मिक पर्यटनाला नवी चालना
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, एमटीडीसीकडील सुमारे 3 एकर 8 आर जमीन शासनाकडे जमा करून ती श्री अंबादेवी संस्थानास विनामूल्य देण्यात येणार आहे. ही जमीन भोगवटादार वर्ग-2 या स्वरूपात देण्यात येईल. मात्र, या जमिनीचा वापर केवळ धार्मिक आणि देवस्थान विकासासाठीच करता येणार असून, कोणत्याही व्यावसायिक किंवा अन्य कारणांसाठी वापर करण्यास स्पष्ट मनाई राहणार आहे. या निर्णयामुळे चिखलदरा परिसरातील धार्मिक स्थळांचा विकास वेग घेईल, तसेच भाविक आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS