Homeमहाराष्ट्रबीड

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात विविध सांस्कृतिक उपक्रम संपन्न

केज । प्रतिनिधीस्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगाव (ता. केज, जि. बीड) येथे भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच विविध राष्ट्रीय व

अंबाजोगाईत विविध विभागांचा महा-आढावा
महापालिकेत भाजपचे ‘कमळ’ फुलले
येडेश्वरी कारखाना परिसरात अजित दादांचे भव्य स्मारक उभारणार

केज । प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगाव (ता. केज, जि. बीड) येथे भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच विविध राष्ट्रीय व सामाजिक दिनांचे औचित्य साधून अनेक सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडले. हे सर्व उपक्रम ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक व सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
दि. 29 डिसेंबर 2025 रोजी संविधान वाचन पंधरवड्याचा समारोप करण्यात आला. यावेळी आयोजित ग्रंथप्रदर्शनाचाही समारोप झाला. कार्यक्रमास वाचक, सभासद, हितचिंतक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दि. 27 डिसेंबर 2025 रोजी गुरु गोविंदसिंह जयंती व वीर बालक दिन ग्रंथवाचन, व्याख्यान व ग्रंथप्रदर्शनाद्वारे साजरा करण्यात आला. प्रारंभी गुरु गोविंदसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीराम गायकवाड यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान केले. सार्थक गायकवाड, कृष्णा गिरी, ज्ञानेश्वर गायकवाड व आनंद भैय्या गायकवाड यांनी ग्रंथवाचन केले. ग्रंथप्रदर्शनास दादासाहेब गायकवाड, माजी सरपंच रामराजे गायकवाड, रावसाहेब जाधव, नारायणभाऊ गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगन गायकवाड, अरुण गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दि. 26 डिसेंबर 2025 रोजी भारतीय स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून स्त्रीमुक्ती विषयावर मान्यवरांनी आपले विचार मांडले. दि. 25 डिसेंबर 2025 रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी आनंद भैय्या गायकवाड यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमांना प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांच्यासह माजी सरपंच रामराजे गायकवाड, रावसाहेब जाधव, ए.बी. गायकवाड, कृष्णा गिरी, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, सार्थक गायकवाड, श्रीराम गायकवाड, छगन गायकवाड, नारायणभाऊ गायकवाड, दादासाहेब गायकवाड, एस.के. वैरागे, रविंद्र गायकवाड, शशिकांत गायकवाड तसेच विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS